घरदेश-विदेशधनुष्यबाण चिन्हासाठी दिल्लीत खलबतं, निवडणूक आयोगाची बैठक सुरू

धनुष्यबाण चिन्हासाठी दिल्लीत खलबतं, निवडणूक आयोगाची बैठक सुरू

Subscribe

उद्धव ठाकरे यांनीही आपला जबाब नोंदवला आहे. त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत शिवसेनेवर हक्क दाखवला आहे. दोन्ही गटाची बाजू ऐकून घेतल्यानंतर कदाचित पुन्हा एकदा नोटीस बजावली जाऊ शकते.

मुंबई – शिवसेना पक्षाचा चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे टोलवल्यानंतर आज निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत होत आहे. या बैठकीत शिवसेनेचं धनुष्यबाण ठाकरे की शिंदे गटाला मिळणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा – … तेव्हा बाप म्हणून उद्धव ठाकरेंच्या मनाला काय वाटलं असेल? किशोरी पेडणेकरांचा शिंदेंना प्रतिसवाल

- Advertisement -

गेल्या तासाभरापासून निवडणूक आयोगाची दिल्लीत बैठक सुरू आहे. दोन्ही गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत. आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जातोय. त्यामुळे निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निकाल देईल, शिवसेना कोणाच्या ताब्यात जाईल याकडे सर्वाचंं लक्ष लागून राहिलं आहे.

४० आमदार, १२ खासदार आणि लाखो पदाधिकारी आपल्या बाजूने असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यासाठी शिंदे गटाने कायदेशीर पुरावेच निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. तर, उद्धव ठाकरे यांनीही आपला लेखी जबाब नोंदवला आहे. त्यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत शिवसेनेवर हक्क दाखवला आहे. दोन्ही गटाची बाजू ऐकून घेतल्यानंतर कदाचित पुन्हा एकदा नोटीस बजावली जाऊ शकते.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेसने सावरकरांचा वारंवार अपमान केलाय, राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात फडणवीस आक्रमक

स्थिती जैसे थे ठेवा

दोन्ही गटाकडून सर्व कागदपत्रे सादर होत नाहीत, तोवर त्वरीत सुनावणी घेऊ नये अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने केली होती. तर, याप्रकरणी त्वरीत सुनावणी घ्यावी अशी विनंती एकनाथ शिंदे गटाने केली होती. शिंदे गटाकडून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यात येणार नाही. त्यामुळे याप्रकरणी त्वरीत सुनावणी होऊ नये असा दावा ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे.

आम्हाला २४ तासांपेक्षा कमी वेळ देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे आम्हाला निवडणूक आयोगाकडे अधिक तपशील सादर करायचा आहे. या प्रक्रियेत शॉर्टकट झाला आहे. चिन्ह्याच्या मुद्द्यावर जलद निकालासाठी दबाव आणण्यासाठी अंधेरीच्या पोटनिवडणुकीचा वापर केला जातोय, असाही आरोप ठाकरे गटाने केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -