घरदेश-विदेशElection Commission of India : निवडणुकीत लहान मुलांचा वापर केल्यास कारवाई; निवडणूक...

Election Commission of India : निवडणुकीत लहान मुलांचा वापर केल्यास कारवाई; निवडणूक आयोगाचा इशारा

Subscribe

जर निवडणुकीच्या कामात लहान मुलांचा वापर होत असल्याचे आढळल्यास राजकीय पक्षासह प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशाराही केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. 

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या कोणत्याही कामात लहान मुलांचा वापर न करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने नियमावली जाहीर केली आहे.

निवडणुकीत राजकीय पक्ष हे पोस्टर्स, प्रचार रॅली, पॅम्प्लेट वापट, निवडणूक सभा आणि निवडणूक प्रचारमध्ये लहान मुलांचा वापर करत होते. पण येथून पुढे निवडणुकीच्या कोणत्याही कामात लहान मुलांचा वापर करू नये, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहे. जर निवडणुकीच्या कामात लहान मुलांचा वापर होत असल्याचे आढळल्यास राजकीय पक्षासह प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशाराही केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Piyush Goyal : पीयूष गोयल मुंबईतून लोकसभा लढण्याची शक्यता; ‘या’ भाजपा आमदाराचा पत्ता होणार कट?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार, कविता, गाणे, राजकीय पक्षाचे प्रदर्शन किंवा उमेदवारांचे चिन्ह यासह कोणत्याही राजकीय प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये. पण कोणत्याही राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रचाराच्या कार्यक्रमात सहभागी नाही. पण त्या कार्यक्रमात लहान मुलेही त्यांच्या आई-वडिलांसोबत असेल, तर ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनक तत्त्वांचे उल्लंघन मानले जाणार नाही, असेही नियमावलीत नमूद केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – World Cup U19 : भारताचे युवा खेळाडू नवव्यांदा अंतिम फेरीत? उपांत्य फेरीत आज द. आफ्रिकेशी लढत

निवडणूक आयोगाने पक्षांना दिल्या ‘या’ सूचना

  • कोणत्याही निवडणूक प्रचारात लहान मुलांना सहभागी करू नये, निवडणूक आयोगाने निर्देश दिले.
  • रॅली, पोस्टर्स वाटप, घोषणाबाजी यासह निवडणूक प्रचारापासून मुलांना दूर ठेवण्याचे आदेश दिले
  • राजकीय नेते आणि उमेदवारांना निवडणूक प्रचार किंवा रॅलीदरम्यान लहान मुलाला त्यांच्या वाहनात ठेवण्याची किंवा नेहण्यासाठी परवानी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -