Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर

Election Commission to Meet Health Ministry Officials Today To Discuss Polls in 5 States Amid Omicron Scare

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात पाच राज्यांच्या निवडणूकांच्या वेळापत्रकाची घोषणा आज केली. त्यानुसार मोठ्या अशा उत्तर प्रदेश राज्यात सात टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. तर उर्वरीत राज्यांमध्ये मणीपूरमध्ये दोन टप्प्यात तर पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यात एका टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. १४ जानेवारीपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात होत आहे. या निवडणुकांसाठीची मतमोजणी आणि निकाल हा १० मार्चला जाहीर होणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणीपूर, गोवा या पाच राज्यांमध्ये ६९० जागांसाठी कोरोनाचे नियमांचे पालन करत ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. कोरोना काळात निवडणूका घेणे आव्हान असल्याचेही निवडणूक आयोगाने यावेळी स्पष्ट केले.

या पाच राज्यांच्या निवडणूकांच्या निमित्ताने २४.९ लाख पहिल्यांदा मतदान करणारे मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. या पाच राज्यांमध्ये २ लाख १५ हजार ३३८ मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल. त्यामध्ये 1620 मतदार केंद्रावर महिला कर्मचारी असणार आहेत. तर १ लाख पोलिंग स्टेशन वेबकास्टिंगच्या माध्यमातून कार्यरत असतील. मतदान केंद्रावर सॅनिटायझेशन आणि मास्कची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मतदारांच्या अनुषंगाने सुविधा एप राजकीय पक्षांसाठी, पीडब्ल्यूडी एप, सी व्हिजिल एप यासारख्या सुविधा मतदान प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

कोविड सेफ इलेक्शन

कोरोनाच्या काळात मतदान घेण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस देऊन लसीकरण पूर्ण झालेले असावेत असे आयोगाने स्पष्ट केले आहे. या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला फ्रंटलाईन वर्कर म्हणून गणले जाईल. तसेच निवडणूक काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बुस्टर डोसही देण्यात येणार आहे.

पाच राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवावा अशा सूचना निवडणूक आयोगाने घेतलेल्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार गोवा ९८ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. उत्तराखंडमध्ये ९९.६ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. युपीमध्ये ९० टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. पंजाब ८२ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. मणीपूर ५२ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. पाचही राज्यात मिळून एकूण १५ कोटी लोकांना पहिला डोस घेतला आहे. तर ९ कोटी लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोरोनामुळे मतदान केंद्रात वाढ १६ टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच पोलिंग बुथनुसार मतदार वाढवण्यात आले आहेत. कोरोनामुळे यंदा मतदानाची वेळ एका तासाने वाढवली आहे.

प्रचारात या गोष्टींना बंदी

रोडशो, पदयात्रा, प्रचार सभा, सायकल रॅलीला असणार बंदी

पाच राज्यांचे वेळापत्रक काय ?

याआधी २०१२ मध्ये ९ टप्प्यात निवडणूका उत्तर प्रदेशसारख्या राज्यात पार पाडल्या होत्या. तर २०१७ मध्ये ८ टप्प्यात निवडणूका पार पडल्या. तर यंदा २०२२ मध्ये सात टप्प्यात निवडणूका पार पडणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूका ७ टप्प्यात टप्प्यात होणार आहेत. तर मणीपूरमध्ये दोन टप्प्यात आणि गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात निवडणूक होईल.

पहिला टप्पा (उत्तर प्रदेश)

नोटीफिकेशन जारी – १४ जानेवारी
अर्ज भरण्याची ताऱीख – २१ जानेवारी
अर्ज मागे घेण्याची तारीख – २७ जानेवारी
मतदानाचा दिवस – १० फेब्रुवारी

दुसरा टप्पा (उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा)

नोटीफिकेशन जारी – २१ जानेवारी
अर्ज भरण्याची ताऱीख – २८ जानेवारी
अर्ज मागे घेण्याची तारीख – ३१ जानेवारी
मतदानाचा दिवस – १४ फेब्रुवारी

तिसरा टप्पा (उत्तर प्रदेश)

नोटीफिकेशन जारी – २५ जानेवारी
अर्ज भरण्याची ताऱीख – १ फेब्रुवारी
अर्ज मागे घेण्याची तारीख – ४ फेब्रुवारी
मतदानाचा दिवस – २० फेब्रुवारी

चौथा टप्पा (उत्तर प्रदेश)

नोटीफिकेशन जारी – २७ जानेवारी
अर्ज भरण्याची ताऱीख – ३ फेब्रुवारी
अर्ज मागे घेण्याची तारीख – ७ फेब्रुवारी
मतदानाचा दिवस – २३ फेब्रुवारी

पाचवा टप्पा (उत्तर प्रदेश, मणीपूर)

नोटीफिकेशन जारी – १ फेब्रुवारी
अर्ज भरण्याची ताऱीख – ८ फेब्रुवारी
अर्ज मागे घेण्याची तारीख – ११ फेब्रुवारी
मतदानाचा दिवस – २७ फेब्रुवारी

सहावा टप्पा (उत्तर प्रदेश)

नोटीफिकेशन जारी – ४ फेब्रुवारी
अर्ज भरण्याची ताऱीख – ११ फेब्रुवारी
अर्ज मागे घेण्याची तारीख – १६ फेब्रुवारी
मतदानाचा दिवस – ३ मार्च

सातवा टप्पा (उत्तर प्रदेश)

नोटीफिकेशन जारी – १० फेब्रुवारी
अर्ज भरण्याची ताऱीख – १७ फेब्रुवारी
अर्ज मागे घेण्याची तारीख – २१ फेब्रुवारी
मतदानाचा दिवस – ७ मार्च

मतमोजणीचा आणि निकालाचा दिवस १० मार्च