घरताज्या घडामोडीAssembly Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक आज जाहीर होणार

Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक आज जाहीर होणार

Subscribe

केंद्रीय निवडणूक आयोग घेणार पत्रकार परिषद

केंद्रीय निवडणूक आयोग देशातील पाच राज्यांमधील निवडणूकांचे वेळापत्रक आज दुपारी जाहीर करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग (ECI) आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती जाहीर करण्यात येणार आहे. देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यात विधानसभा निवडणूकांसाठीचे वेळापत्रक आज जाहीर होईल. निवडणूक आयोगाकडूनही या वेळापत्रकाबाबत पत्रकार परिषद घेणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. आज दुपारी ३.३० वाजता विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोग आणि आरोग्य मंत्रालयाची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य सचिवांसोबत बैठक घेऊन देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यामध्ये लसीकरण न झालेल्या व्यक्तींचे तातडीने लसीकरण करण्याचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यानंतर देशातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगानेही एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला.

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकंदरीतच बैठकांमध्ये घेतलेल्या आढाव्यानंतर आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून निवडणूक प्रचार आणि मतदान कालावधीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत नोंदवले. आरोग्य सचिवांनीही सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण करणे गरजेचे असल्याचे मत नोंदवले. तसेच याआधीच्या बैठकीत पाचही राज्यात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लसीकरण वेगाने वाढवण्याचे निर्देश देण्यात आले होते.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -