घरदेश-विदेशकेंद्रीय निवडणूक आयोग आणि आरोग्य मंत्रालयाची आज बैठक, देशातील विधानसभा निवडणुकांचा निर्णय...

केंद्रीय निवडणूक आयोग आणि आरोग्य मंत्रालयाची आज बैठक, देशातील विधानसभा निवडणुकांचा निर्णय अपेक्षित

Subscribe

देशभरात ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणेकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जातेय. ओमिक्रॉनचे हे संकट लक्षात घेता  निवडणूक आयोग आणि आरोग्य मंत्रालयाची आज एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीत आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सध्याच्या कोरोनाच्या स्थितीवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोग आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्याकडून देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला अनेक अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाला कोरोनाची परिस्थिती पाहता विधानसभेच्या निवडणुका तूर्तास पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांनी पुढील आठवड्यात उत्तर प्रदेशचा दौरा केला आणि परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याचे सांगितले. निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोगाने पंजाब, गोवा आणि उत्तराखंडचा दौरा केला आहे. मंगळवारी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहे.

गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभांचा कार्यकाळ पुढील वर्षी मार्चमध्ये संपत आहे, तर उत्तर प्रदेशातील विधानसभेचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे. मात्र कोरोनाच्या अशा परिस्थितीत निवडणूक आयोगकडून प्रचार, मतदानाचे दिवस आणि मतमोजणीच्या तारखांसाठी कोविड-19 प्रोटोकॉल सुधारण्यासंदर्भात सूचना मागवल्या जाऊ शकतात.


टिटवाळ्यात बंदूकीचा धाक दाखवून दोघांचे अपहरण, २५ लाखांच्या खंडणीची मागणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -