घरElection 2023Election Results 2023 : भाजपाचे खासदार रिंगणात; रणनीती किती फायदेशीर ठरली?

Election Results 2023 : भाजपाचे खासदार रिंगणात; रणनीती किती फायदेशीर ठरली?

Subscribe

नवी दिल्ली : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे, तर तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. यावरून भाजपाची ‘खासदारां’ची रणनीती प्रभावी ठरताना दिसत आहे.

हेही वाचा – Rajasthan Election 2023: राजस्थानात वसुंधरा राजे की बालकनाथ? भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री होणार…

- Advertisement -

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगण या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अनेक खासदारांना रिंगणात उतरवले होते. पक्षाने मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी सात विद्यमान खासदारांना तिकीट दिले होते. भाजपाची ही रणनीती प्रभावी ठरल्याचे चित्र आहे.

मध्य प्रदेशातील ही आहे स्थिती

दिमाणी : केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर हे दिमाणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सध्या ही जागा काँग्रेसकडे होती. काँग्रेसचे रवींद्र तोमर 2018च्या निवडणुकीत येथून विजयी झाले होते. यावेळीही काँग्रेसने रवींद्र तोमर यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार नरेंद्रसिंह तोमर आणि रवींद्र तोमर पिछाडीवर आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Post Results Effect : मतमोजणी सुरू असतानाच भाजपा अन् काँग्रेसकडून ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ सुरू

नरसिंगपूर : नरसिंगपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल निवडणूक रिंगणात आहेत. सध्या ही जागा भाजपकडेच आहे. 2018च्या निवडणुकीत प्रल्हाद पटेल यांचे बंधू जलम यांनी येथून निवडणूक जिंकली होती. मात्र यावेळी त्यांच्या जागी त्यांचे मोठे बंधू प्रल्हाद पटेल यांना तिकीट देण्यात आले आहे. सध्या प्रल्हाद 10 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

निवास : केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते निवास मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सध्या ही जागा काँग्रेसकडे आहे. मात्र, काँग्रेसने विद्यमान आमदाराचे तिकीट कापून चैन सिंह यांना उमेदवारी दिली आहे. आता ही जागा जिंकण्याचे आव्हान कुलस्ते यांच्यासमोर आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार कुलस्ते सुमारे साडेपाच हजार मतांनी मागे आहेत.

हेही वाचा – MP Election Result : भाजपपाठोपाठ कॉंग्रेसची आघाडी; इतर पक्षांना स्थानच नाही

गादरवाडा : खासदार उदय प्रतापसिंह नरसिंहपूरच्या गादरवाडा मतदारसंघातील उमेदवार आहेत. उदय प्रतापसिंह यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून काँग्रेसच्या सुनीता पटेल रिंगणात आहेत. ही जागा काँग्रेसकडे आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार उदय प्रतापसिंह 26 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

सिधी : खासदार रीती पाठक या सिधी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. येथे भाजपाचे बंडखोर केदार शुक्ला यांनी त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. काँग्रेसने येथून ज्ञानसिंह यांना उमेदवारी दिली होती. ही जागा सध्या भाजपाकडे असून आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार ती भाजपाकडेच राहील, असे दिसते. रीती पाठक या सुमारे पाच हजार मतांनी आघाडीवर आहेत.

सतना : खासदार गणेश सिंह सतनामधील भाजपाचे उमेदवार होते. त्यांची लढत काँग्रेसच्या सिद्धार्थ कुशवाह यांच्याशी आहे. ही जागा सध्या काँग्रेसकडे आहे, मात्र यावेळी भाजपा येथे आघाडीवर दिसत आहे. सध्या गणेश सिंह सुमारे 1000 मतांनी आघाडीवर आहेत.

हेही वाचा – Telangana Election : पिछाडीवर असूनही बीआरएस नेत्यांकडून विजयाचा दावा, हालचालींना वेग

जबलपूर पश्चिम : खासदार राकेश सिंह जबलपूर पश्चिममधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी मंत्री तरुण भानोत रिंगणात आहेत. ही जागा काँग्रेसकडे आहे, मात्र आता येथील समीकरणे बदलताना दिसत आहेत. राकेश सिंह जवळपास 22 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

राजस्थानमध्ये हे खासदार होते मैदानात

राज्यवर्धन सिंह राठोड यांना झोटवाडा या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच दिया कुमारी यांना विद्याधर नगर, बाबा बालकनाथ यांना तिजारा, डॉ. किरोडीलाल मीना यांना सवाई माधोपूर, भागीरथ चौधरी यांना किशनगड, देवजी पटेल यांना सांचोर आणि नरेंद्र कुमार खिकर यांना मांडवा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आली आहे.

झोटवाडा : राज्यवर्धन सिंह राठौर यांना जयपूरच्या झोटवाडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. राठोड हे जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री देखील आहेत. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार राज्यवर्धन 28 हजार मतांनी आघाडीवर आहे. तर, काँग्रेसचे अभिषेक चौधरी पिछाडीवर आहेत.

हेही वाचा – छत्तीसगडमध्ये काका – पुतण्याची लढत रंगतदार; मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना पुतण्याचा जोरदार धक्का

विद्याधर नगर : भाजपाने दीया कुमारी यांना विद्याधर नगर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. दिया कुमारी या राजसमंद मतदारसंघाचे खासदार आहेत. याआधी त्या सवाई माधोपूरच्या आमदारही होत्या. जयपूरची राजकुमारी दिया जयपूरचे महाराजा सवाई सिंह आणि महाराणी पद्मिनी देवी यांची कन्या आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार दिया कुमारी सुमारे 61 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

तिजारा : बाबा बालकनाथ हे सध्या अलवर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि बाबा मस्तनाथ विद्यापीठाचे कुलपती आहेत. ते नाथ संप्रदायाचे आठवे प्रमुख महंत आहेत. आतापर्यंत ते 6 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

सवाई माधोपूर : राज्यसभेच्या खासदार डॉ. किरोडीलाल मीना यांना भाजपाने तिकीट दिले आहे. त्यांना राज्यात ‘बाबा’ म्हणूनही ओळखले जाते. किरोडीलाल मीना हे भाजपातून बाहेर पडले आणि पीए संगमा यांच्या राष्ट्रीय जनता पक्षात (आरजेपी) सामील झाले, परंतु त्यांना यश मिळाले नाही. 71 वर्षीय मीणा हे 14 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
किशनगड : भाजपने खासदार भागीरथ चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. ते अजमेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. राजस्थान 2013च्या विधानसभा निवडणुकीत किशनगड मतदारसंघातून आमदारही राहिले आहेत. सध्या ते 31 हजार मतांनी मागे पडून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचा – Assembly Election Result : चार राज्यांच्या निकालावर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात…; ‘मन मन मोदी’

सांचोर : भाजपाने देवजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. देवजी पटले हे सिरोही लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार आहेत. 47 वर्षीय देवजी पटेल हे 44 हजारांहून अधिक मतांनी मागे असून तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

मांडवा : झुंझनूचे खासदार असलेल्या नरेंद्र कुमार खिकर यांना भाजपाने तिकीट दिले आहे. या परिसरात ते ‘प्रधानजी’ म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांनी 2004मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2008मध्ये निवडणूक लढवली, पण पराभवाला सामोरे जावे लागले. 2013 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी होऊन आमदार झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते 17 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

हेही वाचा – Rajasthan Election Results 2023: राजस्थानमध्ये परंपरा कायम! भाजपकडे बहुमत; ‘हे’ दिग्गज नेते पिछाडीवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -