Homeदेश-विदेशPetrol-Diesel Price : निवडणुकीची चाहूल, पट्रोल-डिझेल होणार स्वस्त? निमित्त आंतरराष्ट्रीय बाजाराचे...

Petrol-Diesel Price : निवडणुकीची चाहूल, पट्रोल-डिझेल होणार स्वस्त? निमित्त आंतरराष्ट्रीय बाजाराचे…

Subscribe

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. ज्याचा फायदा भारतीय तेल कंपन्यांना होत आहे. ज्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परंतु, निवडणुकींपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट होणे, हे आगामी निवडणुकीच्यादृष्टीने महत्त्वाचे असल्याने यामुळे निवडणुकांची चाहूल लागल्याचेही बोलले जात आहे. एकीकडे महाागाईने सामान्य नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. तर दुरीकडे मात्र, पेट्रोल-डिझेलच्या दरांत घट होणार असल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. (Election season, Petrol-Diesel will be cheaper? On occasion of international market PPK)

हेही वाचा… Talathi Final Result 2023 : महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; ‘या’ ठिकाणी पाहा

बिझनेस टुडेने दिलेल्या माहितीनुसार, ICRA चा अंदाज आहे की, OMCs ला होत असलेला नफा आंतरराष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पेट्रोलसाठी प्रति लिटर 11 रुपये आणि डिझेलसाठी 6 रुपये अधिक आहे. या नफ्यामुळे सप्टेंबर 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यानंतर काही महिन्यांत पेट्रोलचे व्यापार मार्जिन सुधारले आहे. त्याचवेळी, ऑक्टोबरनंतर डिझेलच्या मार्जिनमध्ये सुधारणा झाली आहे, अशी माहिती ICRA लिमिटेडचे ​​समूह प्रमुख गिरीशकुमार कदम यांच्याकडून देण्यात आली. तर, सध्या कच्च्या तेलाच्या किमती या प्रति बॅरल 80 डॉलर्सच्या खाली व्यवहार करत आहेत, कारण लिबिया आणि नॉर्वेमधील वाढत्या उत्पादनासह कमकुवत मागणीमुळे पश्चिम आशियातील व्यापक संघर्षाची भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. ज्यामुळे याचा फायदा आता भारतातील तेल कंपन्यांना होत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने सध्या याचा फायदा भारतातील तेल कंपन्यांना होत असल्याने दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ही 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये इतकी आहे. मुंबईत सध्या पेट्रोलची किंमत 106.31 रुपये प्रति लिटर असून डिझेलची किंमत 94.27 रुपये प्रति लिटर आहे. त्याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 102.63 रुपये आहे आणि डिझेलची प्रति लिटर किंमत 94.24 रुपये आहे. कोलकातामध्येही पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, भारत त्या सर्व देशांमधून कच्चे तेल आयात करेल ज्यावर बंदी नाही, अशी माहिती काही दिवसांपूर्वीच पेट्रोलियम मंत्र्यांकडून देण्यात आली होती. तर डिसेंबर महिन्यामध्ये पाच राज्यांच्या निवडणुका पार पाडल्यानंतरच पेट्रोलियम मंत्रालयाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली होती. ज्यामुळे आता व्हेनेझुएला या देशाकडून भारतात कच्च्या तेलाची आयात करण्यात येण्याची शक्यता आहे. साधारणतः तीन वर्षांनंतर व्हेनेझुएला या देशातून भारतात कच्चे तेल आयात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचमुळे व्हेनेझुएलातून कच्चे तेल आयात करण्यावर लादलेले आर्थिक निर्बंध 2019मध्ये उठवण्यात आले आहेतय. कमोडिटी मार्केट ॲनालिटिक्स फर्म कॅप्लरच्या मते, व्हेनेझुएलामधून तीन वर्षांपूर्वी नोव्हेंबर 2020 मध्ये कच्च्या तेलाची भारतात आयात करण्यात आली होती.