इलेक्ट्रिक स्कूटर महागणार; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सरकारने इलेक्ट्रिक स्कुटरवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या स्कूटरवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. परिणामी, देशात निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती 4500 ते 5500 रुपयांनी वाढणार आहेत.

Electric two wheeler vehicles price hike fame 2 subsidy
Electric two wheeler vehicles price hike fame 2 subsidy

नजीकच्या काळात इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. कारण सरकारने इलेक्ट्रिक स्कुटरवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या स्कूटरवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे. परिणामी, देशात निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती 4500 ते 5500 रुपयांनी वाढणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी सबसिडी 40 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणण्याची योजना आखली जात आहे. यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाने उच्चस्तरीय आंतर-मंत्रालयीन समितीकडे शिफारस पाठवली होती आता अंतिम निर्णय आला असून, सबसिडी कमी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक दुचाकींच्या किमती वाढणार आहेत. ( Electric two wheeler vehicles price hike fame 2 subsidy )

इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी सबसिडी 15 हजारांवरुन कमी करुन 10 हजार पर्यंत करण्यात आली आहे. दुचाकींचा प्रसार वाढावा तसेच उपलब्ध निधीतून अधिकाधिक वाहनांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

हे फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया (FAME India) अंतर्गत येते, जी इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकारने सुरू केलेली 10,000 कोटी रुपयांची प्रोत्साहन योजना आहे. एका वरिष्ठ FAME India च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी एकूण निधी वाटप 1,000 कोटी रुपयांच्या अखर्चित निधीचा वापर करून 3,500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची योजना आहे.

( हेही वाचा: सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री, तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री )

FAME-2 योजना काय आहे?

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्राने FAME-2 योजना सुरू केली आहे. या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी दिली जाते. FAME-1 योजनेअंतर्गत 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. फेम-2 साठी 10 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.

  • सरकारने एप्रिल 2019 मध्ये FAME-2 योजना सुरू केली. ही पाच वर्षांसाठी होती. 24 मार्च रोजी ही योजना संपणार आहे.
  • योजनेचे एकूण बजेट 10,000 कोटी रुपये होते. दरवर्षी 2000 कोटी रुपयांची सबसिडी दिली जाणार होती. फेब्रुवारी 2023 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही रक्कम वाढवून 5,172 कोटी रुपये करण्यात आली. आतापर्यंत 3,889.94 रुपये खर्च झाले आहेत.
  • 4 मार्च 2023 पर्यंत देशात 9,75,000 इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्या आहेत. यापैकी 65% ची विक्री आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये झाली होती.
  • FY2023 मध्ये विकल्या गेलेल्या EV मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींचा वाटा 60% पेक्षा जास्त आहे.