घरदेश-विदेशBreaking : पाकिस्तानात वीजपुरवठा खंडित, राजधानीसह अनेक जिल्हे अंधारात

Breaking : पाकिस्तानात वीजपुरवठा खंडित, राजधानीसह अनेक जिल्हे अंधारात

Subscribe

Mass Power Cut in Pakistan | आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अद्यापही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

Mass Power Cut in Pakistan | इस्लामाबाद – महागाईमुळे बेहाल झालेल्या पाकिस्तानात आता बत्तीगुल झाली आहे. उच्चदाब ट्रान्समिशन मार्गात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पाकिस्तानातील अनेक भागांत वीज खंडीत झाली आहे. पाकिस्तानात आधीच वीजेचा अपुरा पुरवठा होतोय. तिथे सर्वाधिक काळ लोडशेडिंग असते. म्हणून सरकारने आठ वाजताच वीजसेवा बंद ठेवण्याचे आदेश पाकिस्तानातील विविध बाजारांतील व्यावसायिकांना दिले आहेत. दरम्यान, आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अद्यापही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा – पाकिस्तानचे लवकरच तुकडे-तुकडे, तर भारत पीओके ताब्यात घेईल; मुक्तदर खान

- Advertisement -

कराची, लाहोरसारख्या बऱ्याच भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. क्वेटासहित बलुचिस्तानच्या २२ जिल्ह्येही अंधारात गुडूप झाली आहेत. वीजपुरवठा नसल्याने मेट्रो सेवेवरही परिणाम झाला आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे. इस्लामाबाज वीज पुरवठा कंपनीच्या ११७ ग्रिड स्टेशन्सवर वीजपुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे संपूर्ण इस्लामाबाद शहर आणि रावलपिंडी येथे अंधार पसरला आहे.

बलुचिस्तानच्या २२ जिल्ह्यांसहीत क्वेटा, इस्लामाबाद, लाहोर, मुल्तान आणि कराचीसारख्या जिल्ह्यांत बत्ती गुल झाली आहे. लाहोरमध्ये मॉल रोड, कनाल रोड आणि अन्य क्षेत्रातही वीजचे पुरवठा झालेला नाही. ट्रान्समिशनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने सिंध, खैबर, पख्तूनख्वा, पंजाब आणि राजधानी इस्लामाबादेत वीजसेवा ठप्पा झाली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानात सातत्याने मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. पाकिस्तानात जीवनावश्यक वस्तुंची वाणवा असताना तिथे वीजेचीही कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या नॅशनल इलेक्ट्रिक पॉवर रेग्युलेटरी ऑथोरिटीने कराची शहरांतील वीजदरांत ३.३० रुपये प्रति युनिट वाढ केली आहे. तसंच, विविध ग्राहक विभागानुसार वीजदरांत १.४९ रुपयांपासून ते ४.४६ रुपयांनी प्रति युनिट वाढ केली आहे.

हेही वाचा – पाकिस्तानला कटोरा घेऊन जगभर फिरण्यास भाग पाडले; PM मोदींच्या;त्या; व्हिडीओने पाकमध्ये खळबळ

नवे दर लागू झाल्यामुळे ग्राहकांना ४३ रुपये प्रति युनिट वीज मिळत आहे. यावर सरकार वीज कंपन्यांना १० रुपये प्रति युनिटने सब्सिडीसुद्धा देत आहे. वीज संकटातून बाहेर पडण्याकरता पाकिस्तान सरकारने डिसेंबर २०२२ मध्ये बाजार आणि हॉटेल्समध्ये रात्री आठनंतर वीज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतापेक्षा चौपट वीज महाग

भारतापेक्षा चौपट वीजबिल पाकिस्तानातून आकारले जाते. भारतात प्रति युनिट ६ ते ९ रुपये वीज मिळते. तर व्यावसायिक वापरासाठी १० ते २० रुपये प्रति युनिट वीज मिळते. यामुळे भारतापेक्षा अधिक वीजदर आकारूनही वीजसेवेत खंड पडत नसल्याने वीजपुरवठ्याचे संकट गडद होत आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -