घरदेश-विदेशहत्तींचे देशातील पहिले हॉस्पिटल उत्तर प्रदेशात

हत्तींचे देशातील पहिले हॉस्पिटल उत्तर प्रदेशात

Subscribe

हत्तींचे देशातील पहिले हॉस्पिटल उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्हा मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावरील चुरमुरा गावात सुरू करण्यात आले आहे. येथे हत्तींवर इलाज करण्यासाठी अत्याधुनिक मशिन्स आहेत. तसेच ५ डॉक्टरांची टीम आहे. देशभरातून आजारी हत्तींवर येथे इलाज केले जातात. त्यांच्यावर सर्वोत्तम उपचार करुन त्यांना पुन्हा मूळ ठिकाणी पाठवले जाते.

वाइल्ड लाइफ एसओएसने हत्तींचे हे हॉस्पिटल सुरू केले आहे. एलिफेंट केयर सेंटरमध्ये हत्तींचा सांभाळ केला जातो. देश-विदेशातील लोक हे रुग्णालय पाहण्यासाठी येतात. वाइल्ड लाइफमध्ये २० हत्तींचा सांभाळ केला जातो. दुसरीकडे, देशातील या पहिल्या हत्तींच्या हॉस्पिटलात देशभरातील आजारी हत्तींना आणून त्यांच्यावर उपचार केले जातात. वाइल्ड लाइफ एसओएसचे डायरेक्टर म्हणाले, हत्तींचे हे हॉस्पिटल एका वर्षात बनून तयार झाले आहे. १६ नोव्हेंबरला त्याचे उद्धाटन करण्यात आले. येथे हत्तींना चांगल्या सुविधा पुरवल्या जातात. येथे हायड्रो पीपुल, लेजर मशीन आणि कॅमेर्‍याच्या मदतीने हत्तींवर उपचार केले जातात. येथील डॉक्टरांची टीम हत्तींची काळजी घेते.

- Advertisement -

हत्तींवर उपचार करण्यासाठी हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. यासोबतच येथे हत्तींचे वजन करण्यासाठीही मशीन लावण्यात आली आहे. सर्वात आधी हत्तीचे वजन करून त्यानंतर मशीन्सच्या सहाय्याने त्यांची समस्या समजून घेतली जाते. येथे एक्स-रे मशीन, लेजर मशीन आणि कॅमेरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती येथील डॉक्टरांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -