घरCORONA UPDATEमुरादाबादमध्ये २४ तासांत ११ पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ वर

मुरादाबादमध्ये २४ तासांत ११ पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ वर

Subscribe

मुरादाबादमध्ये २४ तासांत ११ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आता कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ गेली आहे.

मुरादाबादमध्ये २४ तासांत ११ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मुरादाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ गेली आहे. सीएमओच्या म्हणण्यानुसार, ११ लोकांपैकी ५ महिला कोरोना रुग्णांचा समावेश आहे. तसेच या ११ मध्ये सरताजचा तिसऱ्या भावाचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

येथे केली होती पोलिसांवर दगडफेक

मुरादाबादमध्येच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. हे दगड फेक करणारे म्हणत होते की, ‘कोरोनाच्या बहाण्याने सरकार छळ करीत आहेत. आमचा अल्लाह आम्हाला कोरोनापासून वाचवेल’. परंतु, आता अहवाल समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच सरताजच्या कुटूंबाची हळूहळू बातमी समोर येत असून प्रत्येकजण कोरोनाच्या जाळ्यात अडकला असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पॉर्न व्हिडीओ काढून खंडणीची धमकी


मुरादाबादच्या नवावपुरा मोहल्ला येथे राहणारे सरताज यांचे १३ तारखेला कोरोनामुळे निधन झाले. ११ रोजी, सरताजच्या एका भावाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यूही झाला. आता सरताजचा तिसरा भाऊही कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे आणि दोन दिवसानंतर सरताजच्या कुटूंबाचा रिपोर्टही येईल.

- Advertisement -

१७ जण अटकेत

हाजी नेबच्या मशिदीचे क्षेत्र आता कोरोनाचा कारखाना बनत चालले आहे. तसेच येथील लोकांना असे वाटते की, आम्ही डॉक्टर आणि पोलिसांशी लढा देऊन कोरोनाविरूद्ध लढाई जिंकू. दरम्यान, गुरुवारी सलमान खानने दगड फेकणाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत मुरादाबादमध्ये १७ जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित दगडफेक करणार्‍यांचा सध्या शोध सुरू आहे.


हेही वाचा – मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्यांवर कारवाई; भर उन्हात काढल्या उठाबशा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -