घरदेश-विदेशब्रिटनच नाही तर 'या' 14 देशांच्या राणी होत्या एलिझाबेथ द्वितीय

ब्रिटनच नाही तर ‘या’ 14 देशांच्या राणी होत्या एलिझाबेथ द्वितीय

Subscribe

ब्रिटिश राजघराण्याच्या मानाच्या गादीवर गेली सात दशके विराजमान असलेल्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वृद्धपकाळाने निधन झालं आहे. त्या 96 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटीश राजघराण्याकडून आणि ब्रिटन सरकारकडून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात चार अपत्ये, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दरम्यान महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स आता ब्रिटनच्या गादीवर विराजमान होतील.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म 21 एप्रिल 1926 साली लंडनमध्ये झाला. एलिझाबेथ यांचे शिक्षण घरातच झाले. 1952 साली एलिझाबेथ यांचे वडील जॉर्ज यांच्या निधनानंतर त्या ब्रिटनच्या महाराणी म्हणून गादीवर विराजमान झाल्या. 2 जून 1953 रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यांना महाराणीचा मुकुट घालण्यात आला. त्यांनी सलग सात दशकं ब्रिटनच्या महाराणी म्हणून कार्यभार सांभाळला. त्यामुळे जगातील सर्वाधिक काळ महाराणी म्हणून सत्ता उपभोगणाऱ्या एलिझाबेथ ह्या एकमेव महिला सम्राज्ञी होत्या.

- Advertisement -

एलिझाबेथ यांनी फक्त ब्रिटनचे महाराणी पद भूषवले नाहीतर त्या ब्रिटीश राष्ट्रकुल परिषदेतील कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेट समूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, ॲंटिगा आणि बार्बुडा, व सेंट किट्स आणि नेव्हिसया या 16 देशांची महाराणी होत्या.

एप्रिल 2020 मध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. या काळात त्यांनाही कोरोनाची लागण झाली. मात्र यावर त्यांनी यशस्वी मात केली, परंतु वाढत्या वयामुळे त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागत होता. यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे देखील त्यांनी टाळले. काही मोजक्या कार्यक्रमांना त्या उपस्थित राहत होत्या.

- Advertisement -

एलिझाबेथ द्वितीय यांचा विवाह ड्यूक फिलिपशी सोबत झाले होते
1947 मध्ये एलिझाबेथ द्विताीयने फिलिप, ड्यूक ऑफ एडिनबर्गशी लग्न केले. प्रिन्स फिलिप, डेन्मार्क आणि ग्रीसचे चे प्रिन्स, यांचा जन्म 1921 मध्ये झाला आणि त्यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश रॉयल नेव्हीमध्ये काम केले. 2017 मध्ये तो त्याच्या शाही कर्तव्यातून निवृत झाला. झाला. 2021 मध्ये त्यांचे निधन झाले. दोघांना चार मुले होती: चार्ल्स, ऍनी, अँड्र्यू आणि एडवर्ड. आता त्यांचा मोठा मुलगा चार्ल्स (वय 73 वर्षे) ब्रिटनचा राजा आहे.


महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे महात्मा गांधींची एक खास भेट… नरेंद्र मोदींनी सांगितला किस्सा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -