घरटेक-वेकइलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार मोडला, कंपनी कोर्टात जाण्याच्या तयारीत

इलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार मोडला, कंपनी कोर्टात जाण्याच्या तयारीत

Subscribe

फेक अकाऊंटची (Fake Accounts) माहिती देण्यात ट्विटर अपयशी ठरल्याने हा करार रद्द करण्यात आल्याची माहिती इलॉन मस्क यांनी दिली असून याविरोधात आता ट्विटर इलॉन मस्क यांच्याविरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे.

बहुचर्चित ठरलेल्या इलॉन मस्क (Elon Musk) आणि ट्विटरमधील (Tweeter) करार अखेर संपुष्टात आला आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी केलेला ४४ अब्ज डॉलर्सचा करार रद्द केला आहे. फेक अकाऊंटची (Fake Accounts) माहिती देण्यात ट्विटर अपयशी ठरल्याने हा करार रद्द करण्यात आल्याची माहिती इलॉन मस्क यांनी दिली असून याविरोधात आता ट्विटर इलॉन मस्क यांच्याविरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे. (Elon Musk Cancels 44 Billion Dollar Deal To Buy Twitter Company Said Will Go To Court)

हेही वाचा – ट्विटर खरेदीचा करार स्थगित इलॉन मस्क यांनी ट्विट करून दिली माहिती

- Advertisement -

फेक आणि स्पॅम अकाऊंटबाबत इलॉन मस्क यांनी ट्विटरकडे माहिती मागवली होती. मात्र, ट्विटरने ही माहिती दिली नाही. मस्क यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इलॉन मस्क हा करार रद्द करत आहेत. ट्विटरने त्यांच्यासोबत केलेल्या कराराचा भंग केल्यामुळे करार रद्द करण्यात येत आहे. ट्विटरने इलॉन मस्क यांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली. त्यामुळे हा करार रद्द होत आहे.’


ट्विटर करणार कायदेशीर कारवाई

- Advertisement -

दरम्यान, ४४ अब्ज कोटींचा करार इलॉन मस्क यांनी रद्द केल्याने ट्विटरने कायदेशीर बडगा उचलण्याचं ठरवलं आहे.  कंपनीसोबत विलिनीकरण पूर्ण केले नाहीतर ट्विटर न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी कायदेशीर कारवाईबाबत योजना आखत असल्याचं ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टायलो यांनी म्हटलंय. तसेच, इलॉन मस्क यांना करार संपुष्टात आणायचा असेल तर त्यांनी दंड भरावा अशी मागणी ट्विटरच्या भागधारकांनी केली आहे.

काय होता करार?

टेस्ला कंपनीचे मालक आणि जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी ४४ बिलिअन डॉलरचा करार केला होता. यासाठी इलॉन मस्क आणि ट्विटरमध्ये ५४.२० डॉलर प्रति शेअरचा करार झाला होता. मात्र, मे महिन्यात इलॉन मस्क यांनी हा करार थांबवला. ट्विटरमधील फेक खाती पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तरच हा करार करण्यात येईल, असं इलॉन मस्क यांनी म्हटलं होतं. पहिल्या तिमाहित दैनिक सक्रीय वापकर्त्यांमधील बनावट आणि स्पॅम खात्यांची संख्या पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती ट्विटरने दिली होती. तसेच, जाहिराती मिळालेल्या युजर्सची संख्या २२.९० दशलक्ष एवढी होती. तर, इलॉन मस्क ट्विटरमधील स्पॅप बॉट्स पूर्णपणे काढून टाकण्याच्या तयारीत होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -