घरदेश-विदेशElon Musk : दोन सिंगापूर उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे केले अभिनंदन

Elon Musk : दोन सिंगापूर उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे केले अभिनंदन

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) शनिवारी आपल्या PSLV-C55 वरून सिंगापूरचे टेलीओएस-2 (TeLEOS-2) आणि ल्यूमलाइट-4 (LUMELITE-4) हे दोन उपग्रह प्रक्षेपित केले. हे दोन्ही उपग्रह पृथ्वी निरीक्षणासाठी सोडण्यात आले आहेत. या दोन्ही ध्रुवीय उपग्राहाचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी अभिनंदन केले आहे. रविवारी इलॉन मस्क यांनी इस्रोच्या ट्विटला उत्तर देताना “अभिनंदन!”, असे लिहिले आहे.

हेही वाचा – Whatsapp Pay : वीज बिल भरण्याचा आणखी एक पर्याय; या राज्याने घेतला पुढाकार

- Advertisement -

- Advertisement -

दोन्ही सिंगापूर उपग्रह चेन्नईपासून 135 किमी अंतरावर असलेल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2.19 वाजता प्रक्षेपित करण्यात आले. दोन्ही उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, PSLV ने दोन्ही उपग्रहांना अभिप्रेत कक्षेत ठेवले आहे. त्यांनी सांगितले की, “PSLV ने आपल्या 57 व्या मिशनमध्ये पुन्हा एकदा या प्रकारच्या व्यावसायिक मोहिमेसाठी त्याची उच्च विश्वासार्हता आणि उपयुक्तता दर्शविली आहे.”

 टेलीओएस-2 हे एक संप्रेषण उपग्रह असून सिंगापूर सरकारने देशातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तयार केले आहे. हा उपग्रहाचे वजन ७४१ किलो असून दिवस-रात्र आणि सातही दिवस हवामान विषयक माहिती देण्याचे काम करणार आहे. याशिवाय ल्यूमलाइट-4 हा उपग्रह जागतिक शिपिंग समुदायाच्या फायद्यासाठी विकसित केला गेला आहे. सिंगापूरच्या इन्फोकॉम रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या सॅटेलाइट टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरने संयुक्तपणे या उपग्रहाची निर्मिती केली आहे.

हेही वाचा – सुदानमधील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -