Elon Musk झाला सातव्यांदा बाबा; नव्या चिमुकलीचं ठेवलं अजब नाव

Elon Musk, Grimes secretly welcomed second baby in December 2021 via surrogacy
Elon Musk झाला सातव्यांदा बाबा; नव्या चिमुकलीचं ठेवलं अजब नाव

हॉलिवूड गायिका Grimes पुन्हा एकदा आई झाली आहे. Grimesने टेस्लाचे फाऊंडर Elon Muskसोबत आपल्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले आहे. 33 वर्षीय Grimesने वॅनिटी फेअर मॅगझीनच्या एप्रिल इश्यूमध्ये याबाबत खुलासा केला. यापूर्वी Grimes आणि Elon Musk यांना X Æ A-12 नावाचा मुलगा आहे, जो 2 वर्षांचा आहे.

Grimes-Elon Musk चिमुकलीचे ठेवले अजब नाव

50 वर्षीय Elon Musk आणि Grimes यांना डिसेंबर २०२१मध्ये गुपचूप पद्धतीने आपल्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले होते. दोघांना मुलगी झाली आहे. Elon Musk आणि Grimes सरोगेसीद्वारे दुसरी मुलगी झाली आहे. यावेळीही दोघांनी आपल्या मुलीचे अजब नाव ठेवले आहे. वॅनिटी फेअरच्या माहितीनुसार, दोघांनी मुलीचे नाव Exa Dark Sideræl दिले आहे. तसेच मुलीचे निकनेम Y असे ठेवले आहे.

Elon Musk सातव्यांदा बाबा झाला आहे. यापूर्वी पहिल्या पत्नी Justine Wilsonपासून पाच मुलं आहेत. यामध्ये दोन ट्विन्स आणि तीन ट्रिप्लेट्स आहेत. या मुलांची नावं  Xavier Musk, Griffin Musk, Kai Musk, Saxon Musk आणि Damian Musk अशी आहेत. २०२०मध्ये Grimesसोबत Elonने सहाव्यांदा X Æ A-12 मुलाचे स्वागत केले होते.

मुलीच्या नावाचा अर्थ काय?

Grimes ने आपल्या मुलीच्या नावाचा अर्थ वॅनिटी फेअरमध्ये सांगितला आहे. ती म्हणाली की, Exa म्हणजे सुपरकॉम्प्युटिंग टर्म exaFLOPS. तर डार्क ‘अज्ञात’ला रिप्रेझेंट करते. मुलीच्या नावाचा तिसरा पार्ट म्हणजेच Siderælचा उच्चार ‘sigh-deer-ee-el’ असा आहे. Sideræl शब्दाची एल्वेन स्पेलिंग आहे. याचा अर्थ ब्रह्माण्डचा योग्य वेळ, स्टार आणि डीप स्पेसचा वेळ, जो धरतीपासून वेगळा आहे.


हेही वाचा – Elon Musk Net worth: युक्रेनच्या युद्धाचा Elon Muskला मोठा फटका, २०० अब्ज डॉलर्सपेक्षा कमी झाली संपत्ती