घरताज्या घडामोडीElon Musk in Twitter: एलॉन मस्क Twitter बोर्डात सामील होणार नाहीत ,...

Elon Musk in Twitter: एलॉन मस्क Twitter बोर्डात सामील होणार नाहीत , CEO पराग अग्रवाल यांची माहिती

Subscribe

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरबाबत मोठा निर्णय घेतला असून ते स्वत: ट्विटर बोर्डात सामील होणार नाहीत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. तसेच याबाबत ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ट्विट करत यासंबंधीत माहिती दिली आहे. बोर्डात सामील होण्याबाबत त्यांची आणि कंपनीच्या बोर्डाची एलॉन मस्कसोबत चर्चा झाली आहे.

आम्ही सहयोग करण्यासह व्यवसायातील रिस्क फॅक्टरबद्दल उत्सुक आहोत. एलॉन मस्क हे स्वत: इतर सर्व बोर्ड सदस्यांप्रमाणेच कंपनीचे सदस्य होतील असा आमचा विश्वास होता. तसेच त्यांनी कंपनीच्या आणि आमच्या सर्व भागधारकांच्या हितासाठी काम केलं पाहीजे अशी अपेक्षा होती, असं अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

एलॉन मस्क यांच्याकडे सदस्यत्व जाण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. परंतु यामध्ये कंपनीचा सर्वात मोठा भागधारक असल्याने एलॉन मस्क यांच्या इनपुट्सचा विचार केला जाईल, असंही अग्रवाल यांनी म्हटलंय.

- Advertisement -

कंपनीची पार्श्वभूमी तपासणी आणि अनौपचारीक स्वीकृतीनंतर एलॉन मस्कची बोर्डाच्या सदस्यांमध्ये नियुक्ती केली जाईल, असं आम्ही मंगळवारी जाहीर केले होतं. तसेच त्यांची ९ एप्रिलपासून अधिकृतपणे बोर्डावर नियुक्ती होणार होती. परंतु एलॉन मस्कने ट्विटर बोर्डात सामील न होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शेअर केली, असं अग्रवाल म्हणाले.

टेस्लाची ट्विटरमध्ये गुंतवणूक 

एलॉन मस्कने मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरवर ९.२ निष्क्रीय स्टेक खरेदी केले आहेत. या खरेदीनंतर ते कंपनीचा सर्वात मोठे स्टेक होल्डर बनले. एवढंच नाही तर कंपनीच्या बोर्डातही त्यांनी एन्ट्री घेतली होती. मस्क ट्विटरच्या बोर्ड मेंबर्समध्ये सामील होणार होते. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनीही ही माहिती दिली होती. एलॉन मस्क यांचा ट्विटर बोर्डात समावेश करण्यात आला आहे. यावेळी मस्कने ट्विटरच्या इतर बोर्ड मेंबर्समध्ये आणि पराग अग्रवाल यांच्यासोबत काम करण्याबाबतही त्यांनी म्हटले होते. मात्र, आज अचानक एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबत काम करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा : Twitterवरून पराग अग्रवाल यांना डच्चू मिळण्याची शक्यता?, एलन मस्कच्या एन्ट्रीनंतर युझर्सकडून वादाचे संकेत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -