घरताज्या घडामोडीElon Musk : एलन मस्क यांची ट्विटरमध्ये गुंतवणूक, इतके शेअर्स घेतले विकत

Elon Musk : एलन मस्क यांची ट्विटरमध्ये गुंतवणूक, इतके शेअर्स घेतले विकत

Subscribe

दिग्गज उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरमध्ये ९.२ टक्के हिस्सा विकत घेतल्याची माहिती यूएस एसईसी फाइलिंगमध्ये देण्यात आली आहे. द इकॉनॉमिक टाइम्सच्या माहितीनुसार, ट्विटरच्या शेअर्स किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

ब्लूमबर्ग न्यूजमधील एका अहवालानुसार, यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने १४ मार्च २०२२ रोजी केलेल्या फाइलिंगमध्ये असे दिसून आले आहे की, एलन मस्कने ट्विटरमध्ये ९.२ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. Twitter Inc. च्या फाइलिंगनुसार, एलन मस्क ट्विटरच्या ७३,४८६,९३८ शेअर्सचे मालक बनले आहेत. एलन मस्कने ट्विटरमधील स्टेक विकत घेतल्याच्या वृत्तानंतर ट्विटरच्या शेअरमध्ये कमालीची उसळी पाहायला मिळाली आहे. ट्विटरचे शेअर्स ४९.४८ डॉलर्सवर प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये सुमारे २५.८ टक्क्यांवर पोहोचले आहे.

- Advertisement -

नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याबाबत गंभीर विचार करत असल्याचे मस्क यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तत्पूर्वी मस्कने एक ट्विट केले होते. मस्क हे ट्विटरवर खूप सक्रिय आहेत आणि त्यांनी यापूर्वी देखील प्लॅटफॉर्मवर टीका केली आहे.

दरम्यान, एलन मस्क यांनी सूचित केले होते की, ते एक नवीन सोशल मीडिया अॅप लॉन्च करणार आहेत, जे थेट ट्विटरशी स्पर्धा करेल. वास्तविक एलन मस्क म्हणाले की, वापरकर्त्यांना भाषणासाठी आणि संभाषण करण्यासाठी एक फ्री असं व्यासपीठ आवश्यक आहे, जिथे ते खुलेपणाने त्यांचे विचार व्यक्त करू शकतात. या तत्त्वानुसार एलन मस्क यांनी नवीन सोशल मीडिया अॅप लॉन्च करण्याचे संकेत दिले होते.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींसाठी साडेनऊ कोटींचा निधी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -