जगातील अब्जाधीशांच्या यादीत एलन मस्क प्रथम क्रमांकावर, अदानी कोणत्या नंबरवर?

जगातील अब्जाधीशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहेत. या यादीमध्ये टॉप-१० मध्ये भारतातील फक्त एकाच व्यक्तीचा समावेश आहे तर हिंडेनबर्ग अहवालामुळे चर्चेत आलेले उद्योजक गौतम अदानी हे टॉप-२० मधून देखील बाहेर गेले आहेत.

Elon Musk is number one in the list of billionaires in the world, which number is Adani

Bloomberg Index कडून जगातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये अनेक बदल झालेले पाहायला मिळत आहे. यामध्ये टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क हे जगातील प्रथम क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी फ्रान्सचे उद्योजक बर्नार्ड अनॉल्ट यांना मागे टाकत प्रथम क्रमांकावर उडी घेतली आहे.

एलन मस्क यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत ६.९८ अब्ज डॉलर इतकी वाढ झाली आहे. ज्यामुळे मस्क हे जगातील प्रथम क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. एलन मस्क यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीमुळे मस्क यांची संपत्ती आता १८७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. गेल्या काही दिवसात मस्क यांच्या संपत्तीत होणाऱ्या वाढीमुळे ते लवकरच जगातील श्रीमंत व्यक्ती होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

टॉप १० अब्जाधीशांमध्ये २०२१ मध्ये सातत्याने नंबर १ टिकवून ठेवणारे एलन मस्क यांना मागील डिसेंबर २०२२ मध्ये बर्नार्ड अनॉल्ट यांनी मागे टाकले हिते. ज्यामूळे बर्नार्ड अनॉल्ट हे जगातील श्रीमंत व्यक्ती ठरले होते. २०२२ हे वर्ष एलन मस्क यांच्यावर कठीण परिस्थिती ओढवली होती. ४४ अब्ज डॉलरची ट्विटरसोबत डिल झाल्यानंतर एलन मस्क यांची संपत्ती वर्षाच्या सुरुवातीपासून कमी होण्यास सुरवात झाल्याने मस्क चिंतेत आले होते. तर त्यांच्या संपत्तीतील ही घसरण वर्षाअखेरपर्यंत सुरूच होती.

दरम्यान, एलन मस्क यांच्या टेस्लाच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यापासून सातत्याने वाढ होत आहे. ज्यामुळे मस्क यांच्या संपत्तीत कामालाचीही वाढ झाली आहे. एलन मस्क यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये प्रति शेअर १०.७५ डॉलर वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता मस्क हे जगातील प्रथम क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

हेही वाचा – ओवैसी यांच्या व्याह्याची हैदराबादमध्ये आत्महत्या, कौटुंबिक वादातून पाऊल उचलल्याचा संशय

तर दुसरीकडे भारताच्या फक्त एकाच उद्योजकाचा या यादीमध्ये समावेश आहे. या यादीमध्ये रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आपले टॉप-१० यादीमधील स्थान कायम ठेवले आहे. ८१.१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह अंबानी हे १० व्या स्थानावरील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर याआधी अंबानी यांच्यापेक्षा देखील श्रीमंत ठरलेले गौतम अदानी हे थेट ३२व्या क्रमांकावर घसरले आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालामुळे गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये झालेली घसरण आणि त्यामुळे अदाणींच्या कमी झालेली संपत्ती यामुळे अदाणी यांनी श्रीमंतांच्या टॉप-२० मधील देखील आपले स्थान गमावले आहे.