घरताज्या घडामोडीElon Musk Net worth: युक्रेनच्या युद्धाचा Elon Muskला मोठा फटका, २०० अब्ज...

Elon Musk Net worth: युक्रेनच्या युद्धाचा Elon Muskला मोठा फटका, २०० अब्ज डॉलर्सपेक्षा कमी झाली संपत्ती

Subscribe

युक्रेन आणि रशिया यांच्यात मागील अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम या दोन्ही देशांसह भारताला देखील झाला आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क यांच्या संपत्तीवर मोठा परिणाम झाला आहे. शेअर बाजारावर या युद्धाचा मोठा परिणाम झाला असून २०० अब्ज डॉलर्सपेक्षा त्यांची संपत्ती कमी झाली आहे.

१ दिवसात झालं इतकं नुकसान

एकेकाळी एलन मस्कचे एकूण नेटवर्थ ३०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होतं. परंतु काल(बुधवार) त्यांच्या नेटवर्थमध्ये मोठी घट झाली असून १३.३ बिलियन डॉलर्सचा प्रभाव आणि प्रचंड नुकसान मस्कला झालंय. त्यांचं नेटवर्थ कमी होऊन १९८.६ अब्ज डॉलर्सवर गेलंय. श्रीमंत व्यक्तीचं नेटवर्थ २०० बिलियन डॉलर्सपेक्षा कमी आहे. टेस्लाचे सीईओ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.

- Advertisement -

यंदाच्या वर्षात मस्कच्या संपत्तीत घसरण

टेस्ला यांच्या शेअर्समध्ये चौथ्या दिवशी घसरण झाली. टेस्ला यांचे शेअर्स सप्टेंबर महिन्यानंतर अधिक घसरले. यंदाच्या वर्षात मस्क यांना १ जानेवारीपासून ते आतापर्यंत ७१.७ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.

टॉर-५ श्रीमंतांच्या संपत्तीत घट

शेयर बाजारांमध्ये घसरण झाल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका एलन मस्क यांना बसला आहे. जगातील दुसरी श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांची २२.९ बिलियन डॉलर, बर्नार्ड अर्नाल्ट यांची २२.५ बिलियन डॉलर, बिल गेट्स यांची १५.७ बिलियन डॉलर्स आणि लॅरी पेज यांच्या १४.१ बिलियन डॉलर्स इतक्या संपत्तीत घट झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी भारतीय दूतावासाने जारी केली नवीन अ‍ॅडव्हायजरी; हेल्पलाइन क्रमांकही जाहीर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -