Elon Musk : ट्विटर (Twitter) आणि टेस्ला (Tesla), स्पेसएक्स (SpeceX) या कंपन्यांचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांनी बुधवारी (12 जुलै) एक नवीन स्टार्टअप सुरू करण्याची घोषणा केली आहे. xAI नावाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) स्टार्टअप (Startup) आहे. इलन मस्क यांनी बुधवारी या स्टार्टअपची वेबसाइटही लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे या नव्या स्टार्टअपमध्ये गुगल आणि मायक्रोसॉफ्ट इंजिनीअर्सच्या टीमचा समावेश आहे. एलन मस्क यांनी बुधवारी ट्वीट करताना सांगितले की, नवीन स्टार्टअप संदर्भात उद्या (14 जुलै) ट्विटरवर स्पेसेस इव्हेंट देखील आयोजित करण्यात येणार आहे. (Elon Musk New Artificial Intelligence Company Launched by Elon Musk ChatGPT will collide)
हेही वाचा – चांद्रयान -3चे काऊंटडाऊन सुरू, इस्रोच्या ड्रीम प्रोजेक्टबाबत उत्सुकता
मिळालेल्या माहितीनुसार, एलन मस्क यांनी मार्च महिन्यात नेवाडामध्ये X.AI कॉर्प नावाची फर्म नोंदणी केली होती. इलन मस्क या फर्ममध्ये नेतृत्व करताना दिसणार आहेत. याशिवाय जेरेड बर्चाल या फर्ममध्ये सचिव म्हणून काम करतील. बर्चाल हे एलोन मस्कच्या कुटुंब कार्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत.
Announcing formation of @xAI to understand reality
— Elon Musk (@elonmusk) July 12, 2023
स्टार्टअप्समध्ये नोकरी करण्यासाठी अर्ज करा करायचा?
एलन मस्क यांनी स्टार्टअप लाँच करण्याबरोबरच रिक्त जागाही जारी केल्या आहेत. स्टार्टअपच्या भाग बनू इच्छिणाऱ्यांसाठी बेवसाइटवर अर्ज करण्याची मूभा देण्यात आली आहे. नवीन स्टार्टअपमध्ये सध्या DeepMind, OpenAI, Google Research, Microsoft Research, Tesla आणि University of Toronto सारख्या मोठ्या टीममधील लोक काम करत आहेत.
हेही वाचा – काँग्रेस नेते कमलनाथ यांनी सहकाऱ्यांकडे मागितले लाखो रुपये! दोन हॅकर्स गजाआड
स्टार्टअप ChatGPT आणि Bard सोबत करणार स्पर्धा
एलन मस्क यांनी एप्रिल महिन्यात सांगितले होते की, ते एक कृत्रिम बुद्धिमत्ता सुरू करणार आहेत, जी सत्याच्या अगदी जवळ असेल. नवीन स्टार्टअप मायक्रोसॉफ्टच्या ओपनएआयच्या चॅटजीपीटी आणि गुगलच्या बार्डला टक्कर देणार आहे. यासाठी मस्क यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवड करताना डीपमाईंडमधील अल्फाकोड आणि ओपनएआय सारख्या कंपन्यांमध्ये कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्यांना घेतले आहे.