घरताज्या घडामोडीElon Musk : सर्वात जास्त पगार घेणाऱ्यांमध्ये एलॉन मस्क पहिल्या स्थानावर, तर...

Elon Musk : सर्वात जास्त पगार घेणाऱ्यांमध्ये एलॉन मस्क पहिल्या स्थानावर, तर नाडेला सातव्या क्रमांकावर; मस्क यांची संपत्ती किती?

Subscribe

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) हे फॉर्च्युन ५००च्या यादीनुसार सगळ्यात जास्त पगार घेणाऱ्यांमध्ये ते पहिल्या स्थानावर आहेत. जगातील इतर कंपनींच्या सीईओपेक्षा (CEO) मस्क यांना जास्त पगार मिळतो. २०२१ मध्ये मस्क यांना २३.५ अब्ज डॉलर्स अर्थात १.८२ लाख कोटी रूपये पगार मिळाला. टेस्ला ही इलेक्ट्रीक कार कंपनी (Electric car company) असून फॉर्च्युन ५०० कंपन्यांच्या यादीत ६५ व्या क्रमांकावर आहे.

NVIDIA चे सह-संस्थापक आणि सीईओ जेनसेन हुआंग यांना ५०.७ कोटी डॉलर्स पगार असल्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हेस्टिंग्ज चौथ्या क्रमांकावर आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे अ‍ॅपलचे टीम कुक (Apple CEo Tim Cook) दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : विचारस्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते उद्योजक..,एलॉन मस्कचं जितेंद्र आव्हाडांनी केलं अभिनंदन

मायक्रोसॉफ्टचे सीईओ असलेले भारतीय वंशाचे सत्या नाडेला (Microsoft CEO Satya Nadela) यांनी फॉर्च्युनच्या यादीत सातवं स्थान मिळवलं आहे. मागील वर्षी सत्या नाडेला यांना ३०.९४ कोटी डॉलर्स इतका पगार मिळाला. बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीची धुरा गेल्या सहा वर्षांपासून ते सांभाळत आहेत.

- Advertisement -

मस्क यांची संपत्ती किती?

ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, काल सोमवारी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये मोठी भर पडून ती २२४ अब्ज डॉलर्स इतकी झाली. खरं तर २०२२मध्ये त्यांच्या एकूण संपत्तीत ४६.४ अब्ज डॉलर्सची घसरण झाली. टेस्ला कंपनीला २०२०च्या तुलनेत २०२१मध्ये ७१ टक्के अधिक महसूल मिळाला असून त्यांचा एकूण महसूल ५३.८ अब्ज डॉलर्स इतका झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून एलॉन मस्क ट्विटर खरेदीच्या निर्णयावरून चर्चेत होते. ट्विटरच्या खरेदीचा निर्णय सध्या स्थगित झाला असला, तरी एलॉन मस्क यांच्या सध्याच्या सांपत्तिक स्थितीमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते आहे.


हेही वाचा : Delhi Heavy Rain: दिल्लीत मुसळधार पावसामुळे दोन जणांचा मृत्यू; जनजीवनही विस्कळीत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -