घरदेश-विदेशमस्क यांच्या राजीनाम्याला ५७ टक्के युजर्सची मंजूरी

मस्क यांच्या राजीनाम्याला ५७ टक्के युजर्सची मंजूरी

Subscribe

मस्क यांनी राजीनामा देऊ का, असे ट्विट केले आणि जगभरात खळबळ उडाली. मस्क यांनी राजीनाम्याबाबत युजर्सची मते मागितली आणि त्याला प्रतिसादही मिळाला. सुमारे १ कोटी ७५ लाख युजर्सनी मतदान केले. त्यातील अर्ध्याहून अधिक युजर्सनी मस्क यांच्या राजीनाम्याला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे मस्क हे बहुमताचा कौल स्विकारतील का हे येत्या काळात स्पष्ट होईल. 

न्यूयाॅर्कः टेस्ला व ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी राजीनामा द्यावा असा कौल ५७.५ टक्के युजर्सने दिला आहे. तर ४२.५ टक्के युजर्सने त्यांनी राजीनामा देऊ नये, असे सांगितले आहे. त्यामुळे मस्क हे राजीनामा देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मस्क यांनी राजीनामा देऊ का, असे ट्विट केले आणि जगभरात खळबळ उडाली. मस्क यांनी राजीनाम्याबाबत युजर्सची मते मागितली आणि त्याला प्रतिसादही मिळाला. सुमारे १ कोटी ७५ लाख युजर्सनी मतदान केले. त्यातील अर्ध्याहून अधिक युजर्सनी मस्क यांच्या राजीनाम्याला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे मस्क हे बहुमताचा कौल स्विकारतील का हे येत्या काळात स्पष्ट होईल.

- Advertisement -

मस्क यांचे अनेक निर्णय धक्का देणारे ठरले. नोकर कपातीचा निर्णय संंपूर्ण जगाला हादरवणारा होता. तसेच १५० कोटी ट्विटर अकाऊंट बंद होणार आहेत, असेही मस्क यांनी जाहीर केले होते. जे अकाउंट अनेक वर्षांपासून सक्रीय नाहीत. अशा अकाउंटला प्लॅटफॉर्मवरून काढून टाकून नवीन युजर्ससाठी जागा बनवण्यात येईल. हे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे, असे मस्क यांनी सांगितले होते. त्यामुळे ट्विटर युजरची चिंता वाढली आहे. या लिस्टमध्ये आपले अकाउंट आहे का? या प्रश्नाने युजर्स चितेंत आहेत.

- Advertisement -

मस्क यांनी आणखी एका ट्विटमध्ये ट्विटरमधील मोठ्या बदलांबद्दलही सांगितले. मोठ्या धोरणात्मक बदलांसाठीही मतदान होणार आहे. मी माफी मागतो, असे पुन्हा होणार नाही, असे म्हटले होते. तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, तुम्हाला काय हवे आहे त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा, कारण तुम्हाला ते मिळू शकते. फेसबुक, इंस्टाग्राम आणि मास्टोडॉनसह विशिष्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इतर अकाऊंटचा प्रचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अकाऊंटवर बंदी घालण्यात येणार असल्याचे मस्क यांनी सांगितले आहे.

मस्क यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला तरी कंपनीच्या मुख्य निर्णय प्रक्रियेत ते असतील, असेही बोलले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -