घरदेश-विदेशरोलरकोस्टर राइडसारखा ट्विटरचा अनुभव; एलॉन मस्क यांनी का मांडली कैफीयत?

रोलरकोस्टर राइडसारखा ट्विटरचा अनुभव; एलॉन मस्क यांनी का मांडली कैफीयत?

Subscribe

 

नवी दिल्लीः ट्विटरची मालकी म्हणजे रोलरकोस्टर राइडचा अनुभव आहे. ट्विटर विकत घेण्याचा निर्णय चुकला नाही. पण ट्विटरचा अनुभव सुखद नव्हता, असे एलॉन मस्क यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

- Advertisement -

मस्क म्हणाले, ट्विटर माझ्यासाठी वेदनादायी ठरलं आहे. कामाचा इतका ताण असतो की कधी कधी ऑफिसमध्येच झोपावं लागतं. लायब्ररीतील सोफ्यावर झोपावं लागतं. जर ट्विटरसाठी योग्य व्यक्ति मिळाली तर नक्कीच ट्विटर विकून टाकेन.

रात्रीचे ट्वीट करु नये, असा सल्लाही मस्क यांनी दिला आहे. रात्री ट्वीट करणं टाळावं. रात्री केलेल्या ट्वीटमुळे मी माझ्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. त्यामुळे रात्री ३ नंतर ट्वीट करु नये असे मस्क यांनी सांगितले आहे. ट्विटरमधून ८० टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणं सोपं नव्हतं. ट्विटरचे ८ हजार कर्मचारी होते. आता केवळ दिड हजार कर्मचारी आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना ईमेल करुन कामावरुन काढण्यात आलं. प्रत्येक कर्मचाऱ्याशी वैयक्तित संवाद साधता आला नाही, असेही मस्क यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेप घेणारी डॉक्युमेंटरी ट्विटरवरुन का काढली यावर भाष्य करणेही मस्क यांनी मुलाखतीत टाळलं. ज्या मुद्दयाशी संबंधित ट्विट हटविण्यात आले आहे. त्याबद्दल मला माहिती नाही. पण भारतात सोशल मीडियावरील मजकुराबाबत अतिशय कडक नियम आहेत, असं एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे.

ट्विटरची खरेदी केल्यापासून एलॉन मस्क हे या ना त्या कारणामुळे कायम चर्चेत आहेत. मस्क यांनी थेट ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड हटवला. त्याजागी आता ‘Doge’ चा फोटो दिसत आहे.  लोगोमध्ये अचानक Doge दिसल्याने युजर्सना हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. सध्यस्थितीत हा बदल केवळ ट्विटरच्या वेब पेजवर आहे. त्यामुळे ट्विटरच्या युझर्सना मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे. ट्विटरचे होम बटण म्हणून दिसणार्‍या ब्लू बर्डऐवजी आता युजर्सना डॉगेचे चित्र दिसत आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -