Elon Musk यांचा मोठा निर्णय; Twitter यूजर्सला आता ट्विटसाठी मोजावे लागणार पैसे

Maybe A Slight Cost For Elon Musk On Whether Twitter Will Stay Free
Elon Musk यांचा मोठा निर्णय; Twitter यूजर्सला आता ट्विटसाठी मोजावे लागणार पैसे

अवघ्या आठवड्याभरापूर्वी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतले. तेव्हापासून ट्विटर एक चर्चाचा मुद्दा बनला आहे. अशातच मस्क यांनी ट्विट युजर्ससाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्यामुळे युजर्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एलन मस्क यांनी ट्विट करत सांगितले की, भविष्यात आता ट्विटर वापरण्यासाठी युजर्सला शुल्क द्यावे लागणार आहे. मात्र ट्विटर नेहमी कॅज्युअल युजर्ससाठी विनामूल्य असेल, परंतु व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना यासाठी थोडी किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे आगामी काळात काही ठरावीक युजर्सना ट्विटरचा वापर फुकटात करता येणार नाही. त्यामुळे युजर्समध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अलीकडेच इलॉन मस्कने त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘ट्विटर नेहमी अनौपचारिक वापरकर्त्यांसाठी विनामूल्य असेल, परंतु व्यावसायिक / सरकारी वापरकर्ते (व्यावसायिक / सरकारी वापरकर्ते) कदाचित थोडे शुल्क आकारले जाऊ शकते.’ एलन मस्क यांच्या या ट्विटनंतर युजर्स शुल्काबाबत मीम्स शेअर करत आहेत. याआधी मंगळवारी न्यूयॉर्कमधील मेट गालामध्ये एलन मस्क म्हणाले की, ‘अमेरिकेचा मोठा भाग ट्विटरवर असावा आणि संवादात गुंतले पाहिजे.’

काही दिवसांपूर्वीचं एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी 44 अब्ज डॉलरचा करार झाला, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर ट्विटर आता एलन मस्क यांच्या मालकीचे झालेय. अखेर ट्विटरच्या मालकीनंतर आता मस्क व्यवस्थापन पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. मस्क लवकरचं ट्विटरचे सध्याचे सीईओ पराग अग्रवाल आणि पॉलिसी हेड विजया गडदे यांनी पदावरून हटवू शकतात. अशी चर्चा सुरु आहे. तसेच ट्विटरच्या पॉलिसी आणि फिचरमध्येही मोठे बदल करण्याची माहिती समोर येत आहे.

मस्क यांनी गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटर विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ट्विटरने या विक्रीसाठी तीव्र विरोध केला. तसेच कंपनी सुरक्षेसाठीच्या पॉझयन पील रणनिती अंतर्गत या विक्रीस थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र बऱ्याच वाद, संघर्षानंतर अखरे मस्क यांनी 25 एप्रिल रोजी ट्विटर विकत घेतले.


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा, आठवड्याभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा – सर्वोच्च न्यायालय