माझ्या जिवाला धोका.., एलॉन मस्कचं धक्कादायक विधान

twitter elon musk

ट्विटरचे मालक आणि उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटरवर ताबा मिळवल्यानंतर ते नेहमीच चर्चेत असतात. परंतु एलॉन मस्क यांचं एक धक्कादायक विधान समोर आलं आहे. माझ्या जिवाला धोका असून माझ्यासोबत काहीतरी अघटित घडण्याची शक्यता आहे, असं मस्क यांनी म्हटलं आहे.

मस्क यांनी जवळपास दोन तासांचा ऑडिओ चॅट ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी गोळ्या घालून मला ठारही मारलं जाऊ शकतं. त्यामुळं यापुढं मी ओपन कारमध्ये फिरणार नाही, असंही म्हटलं आहे. मस्क यांनी दोन तास वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. माझ्या जिवाला धोका आहे. हा धोका कुणापासून आहे याबद्दल मस्क थेट काही बोलले नाहीत. पण ते लोक असं करणार नाहीत, असंही ते म्हणाले. मात्र, खुलेआम सर्वत्र वावरणं माझ्यासाठी धोका आहे, असं मस्क म्हणाले.

एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर कंपनीत कर्मचारी कपातीची मोहीमच उघडली आहे. हजारो कर्मचाऱ्यांना त्यांनी कामावरून काढून टाकलं आहे. आपल्या एका मेलवर कर्मचाऱ्यांना घरी बसवलं आहे. मस्क यांच्या या निर्णयांनंतर सोशल मीडियातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही मस्क यांच्यावर टीका केली. कंपनीतील वातावरण मस्क यांनी खराब केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या जीवाला धोका असल्याचं मस्क म्हणाले.


हेही वाचा : सर्वेक्षण : भारतात इंटरनेटचा वापर करण्यात महिला पिछाडीवर, लिंग भेदाचं प्रमाण