घरदेश-विदेशअखेर ठरलं! इलॉन मस्क देणार ट्विटरच्या सीईओपदाचा राजीनामा

अखेर ठरलं! इलॉन मस्क देणार ट्विटरच्या सीईओपदाचा राजीनामा

Subscribe

ट्विटरचे नवे मालक आणि सीईओ आता लवकरच पायउतार होणार आहे. मी ट्विटरच्या सीईओपदी राहावं का याबाबत इलॉन मस्क यांनी ट्विटरवर पोल घेतला होता. या पोलला ५७ टक्के लोकांनी पायउतार होण्याला संमती दिली होती. त्यावरून इलॉन मस्क यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांच्या नव्या धोरणामुळे ट्विटरमधील अनेक जुने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कंपनीला सोडचिठ्ठी दिली. तसंच, नुकसान भरून काढण्याकरता एलॉन मस्कने मोठ्या प्रमाणात नोकरकपातही केली. यासर्व गोंधळात इलॉन मस्क यांची प्रतिमा खराब झाली असल्याचं बोललं जात आहे. तसंच, ट्विटरमध्येही बरेच बदल करण्यात आल्याने ट्विटरवापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे, मी ट्विटरच्या सीईओपदाचा राजीनामा देऊ का असा प्रश्न विचारताच ५७ टक्के लोकांनी संमती दिली आहे. त्यानुसार, इलॉन मस्क यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -


मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरचं सीईओ पद सांभाळण्यासाठी पात्र असा मूर्ख व्यक्ती सापडताच मी लगेच राजीनामा देईन. त्यानंतर मी फक्त सॉफ्टवेअर चालवेल आणि सर्व्हर टीमच्या कामकाजावर लक्ष ठेवेन, असं ट्विट एलॉन मस्क यांनी केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -