Exclusive: गिलगिट-बाल्टिस्तान, PoK संदर्भात पाकला घरचा आहेर; पाक IT मिनिस्ट्री म्हणते, हा आमचा हिस्सा नाही

ही परिस्थितीत मात्र पाकिस्तान सरकारसाठी अतिशय लाजिरवाणी आहे. पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओकेवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचे भारत नेहमीच म्हणत आहे. मात्र पाकिस्तान यावर आपलाच अधिकार असल्याचे म्हणत आला आहे. पाकिस्तान सरकारच्या या वृत्तीमुळे या भागांत राहणारे रहिवासीही संतापले आहेत.

Embarrassment for Pak as Its IT Ministry Wing Says Gilgit Baltistan PoK Not Part of Country
Exclusive: गिलगिट-बाल्टिस्तान, PoK संदर्भात पाकला घरचा आहेर; पाक IT मिनिस्ट्री म्हणते, हा आमचा हिस्सा नाही

गिलगिट -बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मुद्द्यावरून पाकिस्तान सरकारवर त्यांच्याच देशात टीकेला सामोरे जावे लागतेय. कारण पाकिस्तान माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या उपकंपनी असलेल्या युनिव्हर्सल सर्व्हिस फंडाने गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओकेमध्ये टेलिकॉम प्रोजेक्ट सुरू करण्यास नकार दिला आहे. यावर युनिव्हर्सल सर्व्हिस फंडाचे म्हणणे आहे की, घटनात्मकदृष्ट्या हा भाग पाकिस्तानचा नाही. दरम्यान यामुळेच सेल्युलर मोबाइल कंपन्या या भागात टेलिकॉम प्रोजेक्ट सुरू करण्यास नकार देऊ शकतात. असं यूएसएफने आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे पाक IT मिनिस्ट्रीने पाकिस्तान सरकारला घरचा आहेर दिला आहे.

ही परिस्थितीत मात्र पाकिस्तान सरकारसाठी अतिशय लाजिरवाणी आहे. पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओकेवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवल्याचे भारत नेहमीच म्हणत आहे. मात्र पाकिस्तान यावर आपलाच अधिकार असल्याचे म्हणत आला आहे. पाकिस्तान सरकारच्या या वृत्तीमुळे या भागांत राहणारे रहिवासीही संतापले आहेत.

दरम्यान गिलगिट-बाल्टिस्तानचे मुख्यमंत्री खालिद खुर्शीद यांनी USF ला या भागात आपली सेवा वाढवण्याची विनंती केली होती. एजन्सीने हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा, जेणेकरून या डोंगराळ प्रदेशात उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करता येईल. अशी त्यांची इच्छा होती. त्याच वेळी यूएसएफ पाकिस्तानच्या इतर भागांमध्ये कोणत्याही अडथळ्यांशिवाय काम करत आहे.

चीनच्या मदतीने पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये बांधकामांना चालना देत आहे. चीन आणि पाकिस्तानमध्ये इकोनॉमिक कॉरिडॉर सुरु आहेत. गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओकेवरून पाकिस्तानचे पितळ उघड झाल्याचं भारतीय तपास यंत्रणांच्या सूत्रांनी म्हटलं आहे. दरम्यान या दोन्ही भागातील जनतेला पाकिस्तानचे खोटं समजलं असून ते आपल्या हक्कासाठी उभे राहिले आहेत.

युनिव्हर्सल सर्व्हिस फंड पाकिस्तानमधील अशांतता क्षेत्र फाटा आणि बलुचिस्तानच्या सारख्या भागात सेवा प्रदान करत आहे. परंतु गिलगिट-बाल्टिस्तान आणि पीओकेमध्ये सेवा देण्यास नकार देत आहे. यावरून यूएसएफने या दोन भागातील लोकांना पाकिस्तानपासून वेगळे केल्याचे थेट संकेत जात आहे.

गेल्या वर्षी एका अहवालानुसार, पाकिस्तान सरकारला आशा होती की, PoK आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये स्पेक्ट्रम अॅक्शन सुरु केले जावे जेणेकरुन पुढच्या पिढीला मोबाइल सेवेचा वापर करता येईल. तसेच टेलिकॉम आणि ब्रॉडबँड सेवांमध्ये सुधारणा होईल.