घरताज्या घडामोडीलवकरच झायडस कॅडिलच्या लसीला भारतात मिळणार मान्यता, १२ ते १८ वयोगटातील मुलांना...

लवकरच झायडस कॅडिलच्या लसीला भारतात मिळणार मान्यता, १२ ते १८ वयोगटातील मुलांना मिळणार डोस

Subscribe

देशात अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर संपला नाही आहे. पण आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यादरम्यान देशवासियांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. देशाची आणखीन एक स्वदेशी लस बाजारात लवकरच येण्यास तयार आहे. काही दिवसांतच झायडस कॅडिला (Zydus Cadila)ची कोरोना लस झायकोवी-डी (ZyCoV-D)ला आपात्कालीन वापरासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)कडून मान्यता मिळू शकते. तीन डोसवाली ही लस डीएनवर आधारित असून १२ ते १८ वयोगटातील मुलांसह सर्वांवर परिणामकारक आहे. जगातील पहिली डीएनएवर आधारित ही लस आहे.

- Advertisement -

झायडसने आपल्या कोरोना लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळण्याकरिता ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे मागणी केली आहे. कंपनीने या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, तज्ज्ञांच्या (एसईसी) या आठवड्यातील बैठकीमध्ये झायडसद्वारे जमा करण्यात आलेला डेटाचे परीक्षण करेल. जर डेटा समाधानकारण असेल तर डीसीजीआय काही दिवसांमध्ये अंतिम मंजूरी देऊ शकते.

झायडस कॅडिलाच्या झायकोवी-डी लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये २८ हजार स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. भारतातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी चाचणी आहे. याचा अहवाल समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या कोरोना लाटेच्या दरम्यान देशात ५० क्लिनिकल साइट्सवर या लसीच्या चाचण्या झाल्या होत्या. ही लस डेल्टा व्हेरियंटवर असरदार असल्याचे सांगितले गेले आहे.

- Advertisement -

झायकोवी-डी ही लस १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित आहे. फार्माजेट तंत्रंज्ञानाच्या मदतीने सुईचा वापर न करता ही लस दिली जाणार आहे. यात विना सुईच्या इंजेक्शनमध्ये औषधं भरले जाते, त्यानंतर एक मशीनमध्ये लावून हातावर दिले जाते. मशीनवर असलेले एक बटण क्लिक केल्यानंतर लसीतील औषधं शरीराच्या आत पोहोचते.


हेही वाचा – आता काही सेकंदात मिळणार Covid-19 रिपोर्ट; इस्रायली तंत्रज्ञान भारतात ठरणार प्रभावी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -