घरदेश-विदेशEmergency In Sri Lanka: श्रीलंकेत परिस्थिती हाताबाहेर, राष्ट्रपतींनी जाहीर केली आणीबाणी

Emergency In Sri Lanka: श्रीलंकेत परिस्थिती हाताबाहेर, राष्ट्रपतींनी जाहीर केली आणीबाणी

Subscribe

श्रीलंकेची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत होत आहे. देशातील जनता रस्त्यावर उतरली असून राजधानी कोलंबोसह संपूर्ण देशात हिंसाचार आणि कोलाहल सुरू आहे. अशी अनियंत्रित परिस्थिती पाहता श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आणीबाणी जाहीर केली आहे. देशभरात तात्काळ प्रभावाने कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी कोलंबोमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले आणि कर्फ्यू मोडून राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर निदर्शने केली. काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

महागाई आणि ढासळलेली अर्थव्यवस्था यामुळे संतापलेले लोक राष्ट्रपतींना राजीनामा देण्याचे आवाहन करत आहेत. देशाच्या आर्थिक स्थितीला सध्याच्या सरकारची धोरणे कारणीभूत आहेत, असे लोकांचे म्हणणे आहे. राजधानी कोलंबोमध्ये हिंसाचार सुरूच आहे. लोकांनी वाहनांना आग लावायला सुरुवात केली आहे. सुरक्षा दल आणि सामान्य जनता आमनेसामने आली आहे. लोकांना बाहेर काढण्यासाठी फायर गॅस सोडण्यात आला.श्रीलंकेत आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात १० जण जखमी झाले आहेत. तर ५० हून अधिक जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. परिस्थिती इतकी बिघडली की स्पेशल टास्क फोर्सला पाचारण करावे लागले आहे. मात्र, अद्याप परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही.

- Advertisement -

ही परिस्थिती पाहता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राजपत्र जारी करून १ एप्रिलपासून संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली.

शिक्षण विभागाकडे पेपर-शाई नाही, परीक्षा पुढे ढकलल्या

श्रीलंकेत इंधन आणि गॅसची तीव्र टंचाई आहे. श्रीलंका सरकारकडे तेल आयात करण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याची मोठी कमतरता आहे. त्यामुळे लोकांना पेट्रोल आणि डिझेलसाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे. शिक्षण विभागाकडे कागद आणि शाईची कमतरता आहे. त्यामुळे परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -