बिहार मुख्यमंत्र्यांच्या विमानाचे गयामध्ये इमर्जन्सी लाँडिंग; दुष्काळाचा घेत होते आढावा

emergency landing of cm nitish kumars helicopter due to bad weather chief minister had gone out to take stock of the drought

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे गया येथे इमर्जन्सी लाँडिंग करण्याच आले. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार शुक्रवारी पाच जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीचे हवाई सर्वेक्षण करण्यासाठी पाटणाहून निघाले होते. मात्र खराब हवामानामिळे त्यांचे हेलिकॉप्टर गया आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव अमीर सुभानीही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार पाटणाहून रवाना झाले होते. ते जेहानाबाद, अरवालसह इतर जिल्ह्यांचे हवाई सर्वेक्षण करणार होते, परंतु हवामान अचानक खराब झाल्याने त्यांच्या हेलिकॉप्टरचे गयामध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

गया आंतरराष्ट्रीय विमानतळावर अचानक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी डॉ. त्यागराजन एसएसपी हरप्रीत कौर आणि इतर अधिकारी विमानतळाकडे रवाना झाले. त्यानंतर ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. विशेष सुरक्षा व्यवस्थेत सीएम नितीश कुमार यांना गया ते खिजरासराय रस्ते मार्गाने पाटण्याला रवाना झाले. मुख्यमंत्र्यांना सोडून जिल्हा दंडाधिकारी आणि एसएसपी पाटणा जिल्ह्याच्या सीमेवर गेले.

यंदा बिहारमध्ये पावसाळ्यात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कमी पावसामुळे अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. दुष्काळी परिस्थिती पाहता पाच जिल्ह्यांची हवाई पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पाटण्याला रवाना झाले होते.


देशातील 13 राज्यांवर विजेचे मोठे संकट; थकित बिलांमुळे तामिळनाडू, महाराष्ट्रावर कारवाई