दिल्लीहून दुबईत जाणाऱ्या स्पाईसजेट विमानाची पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग, जाणून घ्या कारण?

dgca sends notice to spicejet airline seeks response on eight fault incidents in last 18 day

दिल्लीतून दुबईत जाणाऱ्या स्पाईसजेट विमानाने पाकिस्तानातील कराची येथे इमर्जन्सी लँडिंग केली आहे. स्पाईसजेट विमानातील एसजी-११ या विमानात अचानक बिघाड झाल्यामुळे विमानाला पाकिस्तानात लँड करावं लागलं. विमानात १५० हून अधिक प्रवासी होते. परंतु हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

विमानात बिघाड झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु हे प्रवासी आता सुखरूप असून विमानाचं व्यवस्थितपणे लँडिंग करण्यात आलं आहे. स्पाईसजेटच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, स्पाईसजेट बी७३७ विमान संचालक उड्डाण एसजी-११ (दिल्ली-दुबई) या विमानात बिघाड असल्याचं जाणून आल्यामुळे अचानकपणे हे विमान कराचीच्या मार्गाने नेण्यात आलं आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी पाकिस्तानात हे विमान लँडिंग करण्यात आलं. तसेच या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत, असे प्रवक्ते म्हणाले.

कोणत्याही प्रकारची आणीबाणी घोषित करण्यात आलेली नाही. विमानाने अपघात होऊ नये, यासाठी अचानकपणे लँडिंग केले. याआधी या विमानात काही बिघाड झाल्याचे वृत्त नव्हते. प्रवाशांना आहाराची सोय करण्यात आली आहे. दुसरे एक विमान कराचीला पाठवले जाणार आहे. त्यानंतर हे विमान प्रवाशांना दुबईला घेऊन जाईल, असं स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले.

विमान उड्डाणाच्या ५३ मिनिटांनंतर सकाळी जवळपास ८ वाजताच्या सुमारास कराची विमानतळावर सुरक्षित विमान लँडिंग करण्यात आलं. स्पाईसजेट मागील चार तासांपासून अॉन ग्राऊंड असल्याचे पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रवाशांची सुरक्षा घेण्यात येत आहे. विमानात एका ठिकाणी पार्क करण्यात आलं आहे. इंजीनियर या विमानातील बिघाडी चेक करत आहेत. ५००० फूट उंचीवर असताना विमानाने आपला मार्ग बदलल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, दुसऱ्या विमानाने आता हे प्रवासी दुबईत जाणार आहेत.


हेही वाचा : ईडीनंतर संजय पांडे आता सीबीआयच्या रडारवर