घरदेश-विदेशFali Nariman Passes Away : भारताचे ज्येष्ठ विधिज्ञ पद्मविभूषण फली एस नरिमन...

Fali Nariman Passes Away : भारताचे ज्येष्ठ विधिज्ञ पद्मविभूषण फली एस नरिमन यांचं निधन

Subscribe

नवी दिल्ली : प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील फली एस नरिमन यांचे बुधवारी नवी दिल्लीत निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. यासंदर्भातील वृत्त एका वृत्तपत्राने दिलं आहे.

कोण होते फली एस नरिमन?

१० जानेवारी १९२९ रोजी रंगून येथे जन्मलेल्या फली नरिमन यांचे शालेय शिक्षण विविध ठिकाणी झाले. मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी मिळवली. फली यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत जावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती; पण त्यांनी मुंबईतील सरकारी विधि महाविद्यालयात प्रवेश घेतला. सुवर्णपदकासह त्यांनी विधि शाखेची पदवी मिळवली. मुंबई उच्च न्यायालयात १९५० पासून त्यांनी वकिली सुरू केली. वीस वर्षे वकिली केल्यानंतर १९७१ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधिज्ञ बनले. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता लक्षात घेऊन १९७२ मध्ये केंद्र सरकारने अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी त्यांची नियुक्ती केली. १९७५ पर्यंत ते या पदावर होते.

- Advertisement -

हेही वाचा : Farmer Protest : जय शहा यांना जितके क्रिकेट कळते, तेवढेच…; ठाकरे गटाची बोचरी टीका

इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करताच त्याचा निषेध म्हणून त्यांनी लगेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि खासगी वकिली सुरू केली. भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर नरिमन हे युनियन कार्बाइड कंपनीचे वकील होते. मात्र पीडितांची भयानक अवस्था पाहिल्यानंतर ‘आयुष्यात केलेली ही सर्वात मोठी चूक’ अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिलीच, पण या खटल्यात न्यायालयाबाहेर तडजोड घडवून आणताना पीडितांना ४७ कोटी डॉलरची भरपाई मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

- Advertisement -

हेही वाचा : Maratha Reservation : आरक्षणाबाबत सरकारकडून अपेक्षित उत्तर नाही – बाळासाहेब थोरात

सार्वजनिक जीवनातील त्यांच्या कामाची दखल घेऊन सरकारने पद्मभूषण (१९९१) आणि पद्मविभूषण (२००७) देऊन त्यांचा गौरव केला. १९९९ मध्ये राष्ट्रपतींनी राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. विविध मानसन्मानांचे मानकरी असलेल्या फली नरिमन यांना सार्वजनिक व्यवहारातील उत्कृष्ट कार्याबद्दल लालबहादूर शास्त्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. १९९१ ते २०२० या काळात नरिमन हे बार कॉन्सिलचे अध्यक्ष होते. इंटरनॅशनल कॉन्सिल फॉर कमर्शिअल आर्बिटिरेशनचे अध्यक्ष देखील होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -