बायको रुसली अन् माहेरी जाऊन बसली; कर्मचाऱ्याच्या सु्ट्टीची चिठ्ठी व्हायरल

कानपुरमधील एका सरकारी अधिकाऱ्याने आपल्या उच्च अधिकाऱ्याला पत्र पाठवून आपल्या रूसलेल्या बायकोला मनवून परत घरी आणण्यासाठी दोन दिवसाची सुट्टी मागितली आहे.

नवरा-बायकोमध्ये भांडणं होणं यात काही नवल नाही. कारण प्रत्येक घरातील नवरा-बायकोमध्ये अनेक गोष्टींवरून लहान-मोठे खटके उडतचं असतात. यामध्ये कधी कधी एकजण रागवतो,तर दुसरा त्याचा राग घालावायचा प्रयत्न करत असतो. अशामध्ये अनेकदा बायकोचा राग घालवण्यासाठी नवऱ्याला खूप मेहनत घ्यावी लागते. कधी कधी तर रागाच्या भरात बायको घर सोडून आपल्या माहेरी देखील जाते. मग नवरा तिला परत घेऊन येण्यासाठी तिच्या माहेरी जातो. मात्र अशावेळी जे लोक नोकरी करतात. त्यांना बायकोला परत आणण्यासाठी ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागते. त्या सुट्टीसाठी त्यांना अर्ज देखील करावा लागतो.

आता एका नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत सुद्धा असचं काही झालं आहे. त्याने सुद्धा आपल्या रुसलेल्या बायकोला परत आणण्यासाठी ऑफिसकडे सुट्टी मागितली आहे. त्यासाठी त्याने एक पत्र(अर्ज) लिहिला आहे. जे पत्र आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सच्या मते, कानपुरमधील एका सरकारी अधिकाऱ्याने आपल्या उच्च अधिकाऱ्याला पत्र पाठवून आपल्या रूसलेल्या बायकोला मनवून परत घरी आणण्यासाठी दोन दिवसाची सुट्टी मागितली आहे. त्या अधिकाऱ्याचं हे पत्र आता तुफान व्हायरल होत आहे.

शमशाद अहमद यांनी प्रेम नगरच्या विकास अधिकाऱ्यांना पत्र लिहून सांगितले की, “त्यांना तात्काळ सुट्टीची का आवश्यकता आहे. अहमद यांच्या मते, त्यांचे त्यांच्या बायको सोबत भांडण झाले आहे. ज्यामुळे ती रूसून मुलांना घेऊन आपल्या माहेरी गेली आहे.”

अहमद यांनी पत्रामध्ये लिहिलं की, “ते त्यांच्या पत्नीचा रुसवा घालवून तिला परत घेऊन येतील.” त्यामुळे त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना दोन दिवसाच्या सुट्टीची मंजूरी दिली आहे.


हेही वाचा :UAEमध्ये मुसळधार पाऊस, पाण्यात बुडाली वाहनं; व्हिडीओ व्हायरल