घरताज्या घडामोडीअर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! कोरोना काळात नोकरी गमावलेल्या 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार २०२२ पर्यंत...

अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! कोरोना काळात नोकरी गमावलेल्या ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार २०२२ पर्यंत PF

Subscribe

कोणत्याही फॉर्मल सेक्टरमध्ये काम करणारे २५ हजारांहून अधिक कर्मचारी जर त्यांच्या गावी असतील तर त्यांना केंद्र सरकारच्या १६ योजनेमार्फत रोजगार देण्यात येईल

कोरोना महामारीत (Corona pandemic) अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. कोरोनामुळे अनेक जणांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो आहे. मात्र त्यांच्यासाठी आता एक दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे कोरोना काळात नोकरी गमावलेल्या त्यांच्या पीएफ खात्यात २०२२ पर्यंत पीएफचा हिस्सा जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केली आहे. मात्र ही सुविधा केवळ EPFOच्या नोंदणीदारांनाच मिळणार असल्याचे अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Employees who lost their jobs in the Corona pandemic will get PF by 2022)

कोरोना काळात ज्यांनी आपली नोकरी गमावली आहे त्यांच्या कर्मचरी आणि कंपनीकडून देण्यात येणाऱ्या दोन्ही PFचे भाग केंद्र सरकार भरणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी कोरोना काळात नोकऱ्या गमावल्या मात्र त्यानंतर फॉर्मल सेक्टरमध्ये त्यांना छोट्या स्केलच्या कामांसाठी बोलावण्यात आलं त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जर कोणत्याही फॉर्मल सेक्टरमध्ये काम करणारे २५ हजारांहून अधिक कर्मचारी जर त्यांच्या गावी असतील तर त्यांना केंद्र सरकारच्या १६ योजनेमार्फत रोजगार देण्यात येईल असेही निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे २०२० मध्ये मनरेगाचे बजेट ६०००० कोटी रुपयांवरून १ लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. लहान आणि मोठे उद्योग हे खरंतर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे मात्र त्यांना अनेक दशकांपासून स्थान मिळाले नाही ते स्थान आता या सरकारने दिले असल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – DYSP पदावरील मुलाने ASI आईला केला कडक सॅल्यूट! आई-लेकाचा फोटो व्हायरल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -