घरदेश-विदेशJammu Kashmir: पुलवामात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार

Jammu Kashmir: पुलवामात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार

Subscribe

सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, तीन दहशतवाद्यांना ठार करण्यापूर्वी त्यांना आत्मसमर्पण करण्याची अनेक संधी देण्यात आल्या, परंतु प्रत्येक वेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या आवाहनाला गोळीबाराने प्रत्युत्तर दिले.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चांदगाव भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी परिसरात लपून बसलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा (Encounter in Jammu Kashmir) केला आहे. ठार झालेले तीनही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. (Pulwama district)

सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार, तीन दहशतवाद्यांना ठार करण्यापूर्वी त्यांना आत्मसमर्पण करण्याची अनेक संधी देण्यात आल्या, परंतु प्रत्येक वेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या आवाहनाला गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. मात्र यावेळी सुरक्षा दलानेही गोळीबार करत एकापाठोपाठ एक अशा तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. या ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. या चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली आहे. (Jammu Kashmir)

- Advertisement -

यावर काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, या दशतवाद्यांमध्ये एक दहशतवादी पाकिस्तानी होता. चकमकीच्या ठिकाणाहून दोन एम-4 कार्बाइन, एक एके-47 आणि त्याचे मॅगझिन आणि इतर दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहेत. यापूर्वी मंगळवारीही कुलगाममध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. यादरम्यान दोन दहशतवादी ठार झाले असून त्यांच्याकडूनही मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

- Advertisement -

कुलगाम चकमकीत दोन टीआरएफ दहशतवादी ठार, शस्त्रे जप्त

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील ओके गावात मंगळवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. यावेळी देखील सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना आत्मसमर्पणाची संधी दिली होती. परंतु दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करणे सुरुच ठेवले. हे दोन्ही दहशतवादी एका घरात लपून गोळीबार करत होते. वारंवार आवाहन करूनही हे दहशतवादी घराबाहेर पडण्यास तयार नव्हते यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी शस्त्रांचा वापर करून दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.

प्रजासत्ताक दिनी मोठा घातपात घडवण्याची तयारी

जम्मू-काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनी मोठ्या दहशतवादी हल्ल्या घडवण्याचा पाकिस्तानचा कट होता. मात्र हा कट लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाने हाणून पाडला आहे. जम्मू काश्मीरमध्ये पसरलेल्या धुक्यामुळे जम्मू जिल्ह्यातील अरनिया, सांबा येथील रामगड आणि पूंछ जिल्ह्यातील बालाकोट येथील आंतरराष्ट्रीय सीमा नियंत्रण रेषेजवळच्या तीन ठिकाणाहून दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा दलांनी अरनिया येथून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याला ठार केले. तर रामगढमधून काही दहशतवाद्यांनी शस्त्राचा साठा सोडून ठिकाणाहून पळ काढला. त्याचवेळी बालाकोटमध्येही दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यात आले. जवळपास 12 तासात पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे तीन प्रयत्न झाल्याने सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

एका महिन्यात 7 पाकिस्तानी नागरिकांसह 29 दहशतवादी ठार

डिसेंबरपासून सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत सात पाकिस्तानी दहशतवाद्यांसह 29 दहशतवादी मारले गेले आहेत. गेल्या पाच दिवसांत खोऱ्यात 14 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. ज्यामध्ये चार पाकिस्तानी दहशतवादी आहेत.


sindhutai sapkal : पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -