घरदेश-विदेशजवानांचे पाकला प्रत्युत्तर; ४ दहशतवाद्यांना कठंस्नान

जवानांचे पाकला प्रत्युत्तर; ४ दहशतवाद्यांना कठंस्नान

Subscribe

जम्मू काश्मिरमध्ये रमजान महिना सुरु असल्याने सरकारने शस्त्रसंधी उल्लंघनावर बंदी घातली होती. याचाच फायदा घेत पाकिस्तानने तीन पट्टीने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं. १७ एप्रिल ते १७ मे या दरम्यान पाकिस्तानने १८ दहशतवादी हल्ले केले. तर रमजान महिन्यामध्ये १७ मे ते १७ जून दरम्यान ६६ दहशतवादी हल्ले केले. रमजान संपताच सरकारने शस्त्रसंधीवर टाकलेली बंदी हटवली. त्यानंतर पाकिस्तानच्या या खुरापतींना जवानांनी आज चोखप्रत्युत्तर दिलं. बांदीपोरा येथे आज सकाळी जवानांना ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं. शस्त्रसंधीवर टाकलेली बंदी हटवल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

- Advertisement -

४ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश

रमजानच्या पवित्र महिन्यात पाकिस्तानने भारतीय जवान, वृत्तपत्र संपादक आणि नागरिकांवर जोरदार हल्ले केले. या हल्ल्यामध्ये भारताचे २२ जवान शहीद झाले. ईदसाठी जाणाऱ्या जवान औरंगजेबचे अपरहण करुन त्यांची निर्घृण हत्या केली. तर रायझिंग काश्मिर वृत्तपत्राचे संपादकांवर केलेल्या हल्ल्यात त्यांच्यासह २ जणांचा मृत्यू झाला. पाकिस्ताने भारतीय सैन्यांच्या शांततेचा फायदा घेतला. मात्र आता सैन्यांनी त्यांना जशाच तसं उत्तर दिलं आहे. आज सकाळी बांदिपोरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला जवानांनी उत्तर देत ४ दहशतवाद्यांना ठार केलं. सध्या चकमक सुरु आहे.

रमजानमध्ये २२ दहशतवादी ठार

रमाजनमध्ये जवानांना शस्त्रसंधीला बंदी घातली होती. मात्र दहशतवादी हल्ल्या दरम्यान कारवाई करण्यास बंदी नव्हती. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्यूत्तर करताना रमजानमध्ये २२ दहशतवादी ठार करण्यात जवानांना यश आलं. दहशतवाद्यांनी यावेळी पोलिसांच्या चौकी, जवानांच्या कॅम्पला टार्गेट केलं होतं. रमजान दरम्यान जवानांवर दहशतवाद्यांनी २० ग्रेनेड हल्ले केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -