घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये भाजप आमदाराची हत्या करणाऱ्या मास्टरमाईंडचा खात्मा

छत्तीसगडमध्ये भाजप आमदाराची हत्या करणाऱ्या मास्टरमाईंडचा खात्मा

Subscribe

भाजप आमदार भीमा मांडवी यांची हत्या करणारा मास्टरमाईंड नक्षली कमांडर एसीएम वर्गीसला त्याच्या एका साथिदारासोबत ठार करण्यात जवानांना यश आले आहे.

छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला आहे. भाजपा आमदाराच्या हत्येचा मास्टरमाईंड नक्षलवाद्यांसह आणखी एका नक्षलवाद्याचा यामध्ये समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदाना दरम्यान, दुवालीकरका येथील जंगलात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.

भाजप आमदार भीमा मांडवी यांची हत्या करणारा मास्टरमाईंड नक्षली कमांडर एसीएम वर्गीसला त्याच्या एका साथिदारासोबत ठार करण्यात जवानांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुआकोंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी सकाळी सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी देखील चोखप्रत्युत्तर दिले. दरम्यान दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.

- Advertisement -

ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची ओळख एसीएम वर्गीस (मलंगिर एरिया कमेटी माओवादी स्टूडंट विंग प्रभारी) आणि लिंगा (कटेकल्याण एलओएस सदस्य) अशी झाली आहे. या चकमीमध्ये एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला आहे त्याला जवानांनी अटक केली आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आसपासच्या गावातील लोकांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी धमकी दिली आहे.

आज देशभरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. छत्तीसगडच्या तीन लोकसभा मतदार संघामध्ये आज मतदान होत आहे. राजनांदगाव, महासमुंद आणि कांकेर मतदार संघात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. तर येत्या २३ एप्रिलला रायपूर, बिलासपूर, रायगढ, कोरबा, जांजगीर चांपा, दुर्ग आणि सरगुजा लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -