घरदेश-विदेशशोपियांमध्ये चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियांमध्ये चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

शोपियां जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीमुळे शोपियां जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागामध्ये पाकिस्तानच्या खुरापती सुरुच आहे. दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु झाली आहे. आज सकाळी झालेल्या या चकमकीमध्ये चार दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. सुरक्षा दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शोपियाच्या कपरान बतागुंड भागामध्ये जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु केले. दरम्यान याठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनी देखील या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान झालेल्या चकमकीमध्ये ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.

- Advertisement -

चकमक सुरुच

सुरक्षा दलाला शोपियाच्या कपरान बतागुंड भागामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. संपूर्ण परिसराला जवानांनी घेराव घातला. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकित ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. मात्र या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला ताबडतोब उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, चकमक सुरुच आहे.

- Advertisement -

इंटरनेट सेवा बंद

दहशतवादी लपून बसल्यामुळे आणि चकमक सुरु असल्यामुळे दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यामधील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जवानांकडून अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरुच आहे.

हेही वाचा – 

जम्मू – काश्मीरमध्ये ४ दहशतवादी ठार

पंजाबमध्ये ४ दहशतवादी घुसले; जम्मूपासून पंजाबपर्यंत हाय अलर्ट

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; लान्स नायक शहीद

जम्मू – काश्मीरमध्ये २ दहशतवादी ठार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -