घरक्राइमदेशातील सर्वात मोठा चंदन तस्कर बाहशाह मलिकला अटक, ईडीची अनेक ठिकाणी छापेमारी

देशातील सर्वात मोठा चंदन तस्कर बाहशाह मलिकला अटक, ईडीची अनेक ठिकाणी छापेमारी

Subscribe

देशातील सर्वात मोठ्या चंदन तस्कराला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मंगळवारी सकाळी अटक केली. बादशाह मलिक असे या चंदन तस्कराचे नाव आहे. बादशाह मलिक हा अंडरवर्ल्डसह जगभरात अनेक ठिकाणी चंदानाची तस्करी करत होता. ईडीने लाल चंदन तस्करी प्रकरणात सोमवारी बादशाहच्या मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी केली.

लाल चंदन तस्कर बादशाह मलिक आणि विजय पुजारी यांच्याविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाचे (DRI) प्रकरण उघडीस अल्यानंतर ईडीने त्यांच्याविरोधात ईसीआयआर नोंदवला होता. त्या आधारे ईडीने बादशाह मलिकच्या मुंबईतील अनेक ठिकाणांवर छापेमारी केली. ईडीने सोमवारी बादशहा मलिकला चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यानंतर मंगळवारी त्याला अटक करण्यात आली.

- Advertisement -

२०१५ मध्ये डीआरआयला एका आंतरराष्ट्रीय रॅकेटची माहिती मिळाली होती. ज्यातून लाल चंदनसारख्या दुर्मिळ आणि मौल्यवान लाकडाची परदेशात तस्करी सुरु होती. माल निर्यातीच्या कंटेनरमधून याची तस्करी सुरु होती. मुंबई स्थित शिपिंग कंपनीच्या माध्यमातून अन्य देशांमध्ये जवळपास ७८००० मॅट्रिक टनहून अधिक लाल चंदन तस्कराच्या माध्यमातून पाठवण्यात येत होते.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी न्हावा शेवा एक्सपोर्स टर्मिनलवर या तस्करांच्या कंटेनरला ताब्यात घेतले. यावेळी डीआरआयच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली असता या चंदन परदेशात पोहचवण्यासाठी या तस्करांना बादशाह मलिक आणि विजय पुजारी यांची मदत मिळत होती. यातील विजय पुजारीविरोधात यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत. रायलसीमेच्या जंगलातून या चंदनाची तस्करी तो करत होता. लाल चंदनाला चीन, जपान, यूरोप आणि अमेरिकेत विशेष मागणी आहे.


१८ महिलांकडून अशाप्रकारे केली जात होती १.५५ कोटींच्या सोन्याची तस्करी, कस्टमने पकडले रंगेहाथ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -