घरताज्या घडामोडीDelhi Liquor Scam : अरविंद केजरीवाल यांच्या पीएला ईडीकडून समन्स, कथित घोटाळ्याची होणार चौकशी

Delhi Liquor Scam : अरविंद केजरीवाल यांच्या पीएला ईडीकडून समन्स, कथित घोटाळ्याची होणार चौकशी

Subscribe

दिल्लीत आप पक्षाचे नेते मनिष सिसोदिया आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी विविध माध्यमातून चौकशी सुरू आहे. १८ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाबाबत मनिष सिसोदिया यांना सीबीआयने समन्स बजावले होते. त्यानंतर आज अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सहायक (पीए)ला ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे या कथित घोटाळ्याची चौकशी होणार असून केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

ईडीच्या आरोपपत्रात केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख केल्याच्या काही आठवड्यांनंतर हे समन्स बजावण्यात आले आहे. याप्रकरणात सत्येंद्र जैन यांचीही चौकशी करण्यात आली असून, या सर्व प्रकरणात सीबीआय देखील तपास करत आहे. ईडीच्या या निर्णयानंतर आप पक्षाकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे.

याआधी सीबीआयने मनिष सिसोदिया यांना समन्स बजावले होते. याबाबत मनिष सिसोदिया यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली होती. सीबीआयने यापूर्वी सिसोदिया यांची १४ तास चौकशी केली होती. त्यानंतर त्यांच्या घरी आणि कार्यालयावरही छापे टाकले होते.

- Advertisement -

या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात विजय नायर, सरथ रेड्डी, बिनय बाबू, अभिषेक बोनपल्ली आणि अमित अरोरा यांची नावे आरोपी म्हणून ठेवण्यात आली आहेत.


हेही वाचा : दिल्ली विमानतळावर पवन खेरांना अटक, दिल्ली-रायपूर इंडिगो विमान रद्द


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -