घरताज्या घडामोडीइंजिनीअरकडून एअरपॉड्सची हेराफेरी, फ्लिपकार्टला लाखोंचा गंडा ; ३ आरोपींना अटक

इंजिनीअरकडून एअरपॉड्सची हेराफेरी, फ्लिपकार्टला लाखोंचा गंडा ; ३ आरोपींना अटक

Subscribe

कंपनीला लाखोंचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार...

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका माजी कर्मचाऱ्याने कंपनीला लाखोंचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडली आहे. तसेच या प्रकारामुळे फ्लिपकार्टला मोठा आर्थिक फटका बसला आहे. इंजिनीअर असलेल्या एका माजी कर्मचाऱ्याने फ्लिपकार्टमधून खरे एअरपॉड्स मागवून खोटे म्हणजेच बोगस एअरपॉड्स परत केले. यामध्ये फ्लिपकार्टच्या कुरिअर बॉयचा सुद्धा समावेश होता. कारण तो या सर्व प्रकरणात आणि गोष्टी करण्यासाठी त्याला मदत करायचा.

या प्रकरणी अॅपल कंपनीने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती. त्यानंर पोलिसांनी या प्रकरणाची चाचपणी केली असता, फ्लिपकार्टचा माजी कर्मचारी आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. माजी कर्मचाऱ्याचं नाव शुभम मिश्रा असं आहे. तर त्याच्या सहकारी मित्राचं नाव अंकित रैकवार असं आहे. त्याचसोबतच शुभमकडून एअरपॉड्स खरेदी करणाऱ्या दुकानदाराला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

फ्लिपकार्टाने जबलपूर पोलिसांकडे एक तक्रार दाखल केली होती. महागडे एअरपॉड्स डिलिव्हरीसाठी पाठवल्यावर त्याची डिलिव्हरी न होता, ते परत येतात. परंतु त्याच्यामध्ये बोगस एअरपॅड्स असतात. अशी तक्रार ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी फ्लिपकार्टने केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपास करताना हेराफेरी करणाऱ्या शुभम मिश्राचं नाव समोर आलं. त्याच्यामुळेच हे कारभार सुरू होते. त्यामुळे त्यानं फ्लिपकार्टला चांगलाच दणका दिला आहे.

शुभम मिश्रा वेगवेगळ्या नंबरवरून एअरपॉड्स मागवत होता. तसेच एअरपॉड्सच्या डिलिव्हरीची जबाबदारी ही त्याने अंकितकडे सोपवली होती. अंतिक एअरपॉड्सचे पार्सल घेऊन यायचा. त्यानंतर तो शुभमकडे हे पार्सल द्यायचा. परंतु शुभम चलाखी करत नवीन आणि चांगले एअरपॉड्स काढून घ्यायचा आणि बोगस त्यामध्ये ठेवून द्यायचा. ही काम झाल्यानंतर अंकित पार्सलची नोंद अनडिलिव्हर्ड म्हणून करायचा. शुभम चांगले एअरपॉड्स दुकानदाराला जाऊन विकायचा, हे प्रकरण लक्षात आल्यानंतर फ्लिपकार्टने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे ५ लाख किमतीचे एअरपॉडस जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा: गनिमी काव्याने सरकार आणणार, दरेकरांचा सत्ता स्थापनेचा मोठा दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -