घरदेश-विदेशमध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना मच्छर चावल्यानं अभियंता निलंबित

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना मच्छर चावल्यानं अभियंता निलंबित

Subscribe

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मच्छर चावल्यानं एका अभियंत्याला निलंबित करण्यात आलं आहे. १७ फेब्रुवारीला हा प्रकार घडला. गेस्ट हाऊसमध्ये साफसफाई न केल्यामुळं अभियंत्याला कामावरुन निलंबित करण्यात आलं आहे. मध्य प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर शिवराज सिंह चौहान यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर ते सीधी येथी गेस्ट हाऊसमध्ये गेले असता हा प्रकार घडला.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अपघातात मृत पावलेल्या पीडित कुटुंबाला भेटायला गेले होते. त्यानंतर ते सीधी येथील गेस्ट हाऊसमध्ये गेले. तेथे असलेल्या घाणीमुळे मच्छर शिवराज सिंह चौहान यांना चावल्या. एवढंच नाही तर टाकीतून पाणी भरुन वाहत होतं. त्यामुळे रेवा विभाग आयुक्तांनी आदेश जारी करत अभियंत्याला निलंबित केलं.

- Advertisement -

अपघाताची बातमी कळताच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान थेट पोहोचले होते. मंगळवारी सकाळी या बस अपघातात ५१ जणांचा मृत्यू झाला. शिवराजसिंह चौहान यांनी दौऱ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना बस अपघातातील दोषी सोडले जाणार नाहीत, असं सांगितलं.

मोठ्या अधिकाऱ्यांवर टांगती तलवार

मुख्यमंत्री भोपाळमध्ये परत आल्यानंतर मंत्रालयातील उच्च अधिकाऱ्यांना गेस्ट हाऊसमध्ये त्यांना आलेल्या अडचणी समजल्या. सर्किट हाऊसचे प्रभारी अभियंता यांना निलंबित करण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्रकुमार सिंग यांच्या २ वार्षिक वेतनवाढीवर बंदी घालण्याचा आदेश जारी करताना रेवा आयुक्त राजेश जैन यांनी सर्किट हाऊसचे प्रभारी उपायुक्त बाबूलाल गुप्ता यांना त्वरित निलंबित केलं आहे. याचा फटका जिल्ह्यातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सहन करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि एसपी देखील त्यांच्या कचाट्यात येऊ शकतात.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -