घरदेश-विदेशएकतर्फी प्रेमातून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला जिवंत जाळले

एकतर्फी प्रेमातून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला जिवंत जाळले

Subscribe

केरळमध्ये एका व्यक्तिने घरात घुसून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला जिवंत जाळले. ही धक्कादाय घटना केरळच्या त्रिशूरमध्ये घडली आहे. आरोपी गेल्या काही दिवसापासून या विद्यार्थिनीचा पाठलाग करत होता. या मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने आसपास राहणाऱ्या लोकांनी तिच्या घरी धाव घेतली. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण तोपर्यंत पीडित मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.


हेही वाचा – नाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून तीन जणींना जिवंत जाळले

- Advertisement -

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसापासून ३२ वर्षीय आरोपी नितीन २२ वर्षाच्या पीडित विद्यार्थिनीचा पाठलाग करत होता. बुधवारी आरोपी पीडित तरुणीचा पाठलाग करत तिच्या घरापर्यंत आला. त्याने तिच्या घरात घुसून तिला जिवंत जाळले. पीडित तरुणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आसपास राहणाऱ्या नागरिकांनी घरामध्ये धाव घेतली. त्यावेळी पीडित तरुणी बाथरुममध्ये जळताना दिसली.


हेही वाचा – मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाला जिवंत जाळले

- Advertisement -

घरात कुणी नसल्याचा घेतला फायदा

स्थानिक आमदार के. राजन यांनी सांगितले की, आरोपी नितीन पीडित तरुणाच्या घराला असलेल्या मागच्या दरवाजाने घुसला असावा. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पीडित तरुणी आणि तिची आजी घरामध्ये उपस्थित होती. त्यावेळी आरोपीने घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत तरुणीला जिवंत जाळले. त्यानंतर आरोपी फरार झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडित तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.


हेही वाचा – धक्कादायक: प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन मुलीला जीवंत जाळले


विद्यार्थिनीला जिवंत जाळण्याची दुसरी घटना

याप्रकरणी केरळ पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणाचा कसून तपास पोलिसांकडून सुरु आहे. केरळमध्ये ही विद्यार्थिनीला जिवंत जाळल्याची ही दुसरी घटना आहे. केरळच्या तिरुवल्ला भागामध्ये गेल्या महिन्यात एका कॉलेजच्या विद्यार्थिनीला जिवंत जाळले होते. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -