होय, मी ब्रिटनच्या पंतप्रधानांची सासू आहे; सुधा मुर्तींनी सांगितला ‘तो’ किस्सा

युनायटेड किंगडमचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती यांनीही अनेक मजेदार किस्से शेअर केले आहेत. सुधा मूर्तींचे हे वक्तव्य ऐकून कपिलही हैराण झाला होता.

Entertainment news Kapil Sharma Show Sudha Murthy said no one believes that i am the mother in law of Uk Pm Rushi Sunak
Entertainment news Kapil Sharma Show Sudha Murthy said no one believes that i am the mother in law of Uk Pm Rushi Sunak

द कपिल शर्मा शोच्या एपिसोडमध्ये प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती आल्या होत्या. नुकतचं सुधा मुर्ती यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सुधा मूर्ती यांनी कपिल शर्मा यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत.( Entertainment news Kapil Sharma Show Sudha Murthy said no one believes that i am the mother in law of Uk Pm Rushi Sunak )

युनायटेड किंगडमचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू सुधा मूर्ती यांनीही अनेक मजेदार किस्से शेअर केले आहेत. सुधा मूर्तींचे हे वक्तव्य ऐकून कपिलही हैराण झाला होता. सुधा मूर्ती या इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत आणि त्यांच्या मुलीचे पती ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आहेत.

नेमका तो किस्सा काय?

सुधा मूर्ती यांनी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, एका इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्यांना त्यांचा लंडनचा पत्ता फॉर्मवर भरायला लावला. त्यात त्यांनी 10 डाउनिंग स्ट्रीट असं लिहिलं. यावर विश्वास ठेवण्यास त्या अधिकाऱ्याने नकार दिला आणि तुम्ही माझी मस्करी करत आहात का? असं विचारलं. हे युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय आहे. ही संपूर्ण कहाणी सांगताना सुधा मूर्ती म्हणाल्या की, एकदा मी लंडनला गेले तेव्हा एका अधिकाऱ्याने मला विचारले की तू लंडनमध्ये कुठे राहतेस तेव्हा माझ्यासोबत माझी मोठी बहीण होती आणि मला वाटले की मी ’10 डाउनिंग स्ट्रीट’ लिहावं कारण माझा मुलगाही तेथे (यूकेमध्ये) राहतो, परंतु मला त्याचा पूर्ण पत्ता आठवत नव्हता. माझ्या मुलाचा पत्ता आठवत नसल्याने मी शेवटी 10 डाउनिंग स्ट्रीट लिहून ठेवल. मग इमिग्रेशन ऑफिसर माझ्याकडे बघून म्हणाले, मस्करी करत आहेस का? त्यावर उत्तर देत सुधा मूर्ती म्हणाल्या की नाही, मी तुम्हाला खरं सांगत आहे खोटं नाही, तरीही त्यांना वाटले की मी मस्करी करत आहे. या घटनेचे वर्णन करताना त्या म्हणाले की मी 72 वर्षांची एक साधी महिला ब्रिटनच्या पंतप्रधानांची सासू असू शकते यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.

( हेही वाचा: Karnataka CM सिद्धरामय्या, DCM डी.के. शिवकुमार; KC वेणुगोपाल यांची घोषणा )