(EPF) नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबाबत (EPF) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीटीने शुक्रवारी 2024-25साठी ईपीएफवरील व्याजदर 8.25 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. फेब्रुवारी 2024मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2023-24साठी ईपीएफवरील व्याजदर किरकोळ वाढवून 8.25 टक्के केला होता. विविध सरकारी तसेच खासगी कार्यालय आणि कंपन्यांमधील सुमारे 7 कोटी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. हा व्याजदर वाढवला जातो की, त्यात कपात करण्यात येते, याकडे या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. (No change in provident fund interest rate)
ईपीएफओबाबत निर्णय घेणारी शिखर संस्था असलेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टिजने (सीबीटी) शुक्रवारी झालेल्या बैठकीत 2024-25साठी भविष्य निर्वाह निधीवर 8.25 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ईपीएफओशी संबंधित सूत्रांनी दिली. सीबीटीच्या निर्णयानंतर, 2024-25साठी ईपीएफ ठेवींवरील व्याजदर मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. सरकारच्या मंजुरीनंतर, 2024-25साठी ईपीएफवरील व्याजदर सात कोटींहून अधिक ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात जमा केला जाईल.
EPFO fixes 8.25 pc interest rate on employees’ provident fund deposits for 2024-25: Sources#EPFO pic.twitter.com/qW6OwnaBGg
— Press Trust of India (@PTI_News) February 28, 2025
सन 2022-23मध्ये हा व्याजदर 8.15 टक्के होता. त्याचप्रमाणे, ईपीएफओने 2021-22साठी व्याजदर घटवून 8.1 टक्क्यांवर आणला होता. चार दशकांतील ही नीचांकी होती. (त्याआधी 2020-21मध्ये हा व्याजदर 8.5 टक्के होता.) 2021-22 सालचा 8.1 टक्के व्याजदर 1977-78 नंतरचा सर्वात कमी दर होता. त्यावेळी ईपीएफचा व्याजदर आठ टक्के होता. 2018-19साठी असलेला 8.65 टक्के व्याजदर मार्च 2020मध्ये, ईपीएफओने 219-20साठी 8.5 टक्क्यांपर्यंत कमी केला होता.
हेही वाचा – Sanjay Raut on Eknath Shinde : औरंगजेबासारखेच एकनाथ शिंदे…, काय म्हणाले संजय राऊत?
ईपीएफओने 2016-17मध्ये 8.65 टक्के आणि 2017-18 मध्ये 8.55 टक्के व्याजदर दिला होता. तर, 2015-16मध्ये त्यापेक्षा जास्त म्हणजे 8.8 टक्के व्याजदर थोडा जास्त होता. याशिवाय, 2013-14 तसेच 2014-15मध्ये ईपीएफओ 8.75 टक्के व्याजदर दिला होता. 2012-13 तसेच 2011-12मध्ये तो अनुक्रमे 8.5 टक्क्यांहून अधिक आणि 8.25 टक्के होता.
हेही वाचा – CM Fadnavis on Yogesh Kadam : जरा सांभाळून बोला, फडणवीसांचा योगेश कदमांना अनुभवाचा सल्ला