Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Coronavirus: कोरोनाची दुसरी लाट असूनही एप्रिलमध्ये लाखो मिळाल्या नोकऱ्या

Coronavirus: कोरोनाची दुसरी लाट असूनही एप्रिलमध्ये लाखो मिळाल्या नोकऱ्या

Related Story

- Advertisement -

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लाखो लोकं बेरोजगार झाले आहेत. अनेकांना अजूनही कमी पगारात काम करावे लागत आहे. पण अशी परिस्थिती असूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिलमध्ये लाखो नोकऱ्या मिळाल्याचे समोर आले आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेत (EPFO) एप्रिल २०२१मध्ये १२.७६ लाख कर्मचारी सामील झाले आहेत. मार्चच्या तुलनेत १३.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२१मध्ये ११.२२ लाख कर्मचाऱ्यांच्या EPFOमध्ये समावेश झाला होता. याबाबतची माहिती कामगार विभागाने दिली आहे.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ईपीएफओमध्ये एकूण ७७.०८ लाख नवे सदस्य जोडले गेले आहेत. ही संख्या एक वर्षापूर्वी ७८.५८ लाख होती. ही संख्या पाहून हे कळते की, कोरोना महामारी दरम्यान संघटित क्षेत्रात नोकरीच्या संधी कशा निर्माण झाल्यात आहेत.

- Advertisement -

माहितीनुसार, ईपीएफओत एप्रिल २०२१मध्ये १२.७६ लाख सदस्य (कर्मचारी) जोडले गेले. कोरोनाची दुसरी लाट असूनही मार्च २०२१च्या तुलनेत नवे कर्मचारी संख्येत १३.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, मार्च २०२१ची तुलनेत एप्रिल २०२१मध्ये ईपीएफओ सदस्य सोडणारी संख्या ८७ हजार ८२१ने कमी झाली. त्याच प्रमाणे यादरम्यान पुन्हा ईपीएफओत जोडलेल्या सदस्यांची संख्या मार्चपासून ९२ हजार ८६४हून अधिक झाली आहे.

मे २०२१मध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ईपीएफओमध्ये नव्या कर्मचाऱ्यांमध्ये २ लाख ८४ हजार ५७६ने घट झाली होती. याचा अर्थ एप्रिल २०२०मध्ये ईपीएफओ सोडणाऱ्या सदस्यांची संख्या जोडलेल्या आणि पुन्हा जोडलेल्या सदस्यांपेक्षा अधिक आहे. याचे प्रमुख कारण कोरोनाची पहिली लाट आणि सरकारकडून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन. आता एप्रिल २०२१मध्ये ईपीएफओ जोडलेल्या १२.७६ लाख नव्या सदस्यांमध्ये जवळपास ६.८० लाख सदस्य पहिल्यांदा ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आले आहेत.

- Advertisement -