घरअर्थजगतEPFO : UAN शिवाय येतायत अडचणी, PF खातेधारक असा ऑनलाईन करू शकतात...

EPFO : UAN शिवाय येतायत अडचणी, PF खातेधारक असा ऑनलाईन करू शकतात जनरेट

Subscribe

UAN च्या मदतीने कर्मचारी EPF खात्याचे पासबुक मिळवू शकतो आणि कधीही आणि कोठूनही ऑनलाईन त्याच्या खात्यातील शिल्लक तपासू शकतो.

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सर्व सदस्यांना युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) दिला जातो. EPF खाते व्यवस्थापित करण्यासाठी UAN खूप उपयुक्त आहे. 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे EPF खाते उघडणे बंधनकारक आहे. कंपनी कर्मचाऱ्यांचा UAN देखील तयार करू शकते. हे काम ईपीएफओच्या वेबसाइटद्वारे केले जाते. कर्मचारी स्वत: EPFO ​वेबसाईटला ऑनलाईन भेट देऊन त्याचा UAN तयार किंवा सक्रिय करू शकता.

12 अंकी UAN अनेक कर्मचाऱ्यांसाठी येतो. याद्वारे कर्मचाऱ्याला त्याच्या ईपीएफ खात्याची संपूर्ण माहिती मिळू शकते. UAN च्या मदतीने कर्मचारी EPF खात्याचे पासबुक मिळवू शकतो आणि कधीही आणि कोठूनही ऑनलाईन त्याच्या खात्यातील शिल्लक तपासू शकतो. याशिवाय UAN च्या मदतीने कर्मचारी आपल्या PF ची रक्कम जुन्या खात्यातून नवीन खात्यात ट्रान्सफर करू शकतो. त्याच्या मदतीने कर्मचारी EPF मधून आंशिक भांडवल काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

- Advertisement -

UAN जनरेट करण्याचा हा मार्ग

>> EPFO च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
>> ‘डायरेक्ट UAN वाटप’ वर क्लिक करा.
>> आता तुमचा आधार लिंक केलेला मोबाईल नंबर आणि दिलेला कॅप्चा कोड टाका.
>> आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी एंटर करा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा.
>> “तुम्ही खासगी कंपनीत काम करता का” यासाठी ‘होय’ निवडा.
>> त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनूमधून रोजगार श्रेणी निवडा
>> कंपनीत सामील होण्याची तारीख आणि ओळख पुरावा यापैकी एक पर्याय निवडून ओळख पुरावा अपलोड करा
>> तुमचा आधार किंवा व्हर्च्युअल आयडी क्रमांक टाका
>> जनरेट OTP वर क्लिक करा आणि नंतर तुमच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP एंटर करा. तुमची माहिती >> UIDAI द्वारे प्रमाणित केली जाईल.
>> त्यानंतर ‘नोंदणी’ बटणावर क्लिक करा, तुमचा UAN जनरेट होईल.

UAN नंबर असा करा सक्रिय

>> EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर ‘सदस्य पोर्टल’ वर जा आणि ‘Activate UAN’ वर क्लिक करा.
>> तुमचा आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, कॅप्चा कोडसह तुमचा UAN क्रमांक टाका.
>> ‘Get Authority pin’ वर क्लिक करा.
>> तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल.
>> तुमचा UAN सक्रिय होईल आणि पासवर्ड तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येईल.
>> आता तुम्ही तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून तुमच्या EPF खात्यात लॉगिन करू शकता.

- Advertisement -

हेही वाचाः आता क्रेडिट कार्डही यूपीआयला लिंक होणार, आरबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -