घरदेश-विदेशनोकरदारांची चिंता मिटली; UNA नंबर Aadhaar कार्डला लिंक करण्याची मुदत वाढली

नोकरदारांची चिंता मिटली; UNA नंबर Aadhaar कार्डला लिंक करण्याची मुदत वाढली

Subscribe

UAN Aadhaar Link: केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधीसाठी ( EPFO) वापरल्या जाणारा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि आधार कार्ड (Aadhaar number) लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. त्यामुळे आता नोकदारांना पीएफ खाते UAN नंबर आणि आधार लिंक दोन्ही गोष्टी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लिंक करता येणार आहे. मात्र बाकीसाठी लास्ट डेट ३० डिसेंबरपर्यंतच असेल. यापूर्वी पीएफ खात्याला UAN नंबर आणि आधार लिंक नसल्यास पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तुर्तास का होईना नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.

EPFO खातेदारांना ईपीएफ अकाऊंट आधारकार्डला लिंक करणे अनिवार्य आहे. कारण असे न केल्यास पीएफ कॉन्ट्रिब्यूशन रोखले जाऊ शकते. यामुळे EPF खात्यात जमा झालेली रक्कम काढण्यात अडचणी येतात. यापूर्वी ही मुदत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली होती.

- Advertisement -

सोप्या स्टेप फॉलो करून आधार लिंक करा

१) ईपीएफओचे अधिकृत संकेतस्थळ www.epfindia.gov.in वर जाऊन लॉग इन करा

२) त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करा. नंतर ई-केवायसी पोर्टलवर जा. या ठिकाणी link UAN aadhar वर क्लिक करा.

- Advertisement -

३) यूएएन अकाउंटशी नोंदणी झालेला तुमचा यूएएन नंबर आणि मोबाइल नंबर अपलोड करा.

४) त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी नंबर बॉक्समध्ये भरा. 12 नंबरचा आधार नंबर टाकून फॉर्म सबमिट करा. आता ओटीपी व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा.

५) तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडीवर एक ओटीपी येईल. त्याने आधार नंबरला व्हेरिफाय करा. या व्हेरिफिकेशननंतर तुमचे आधार पीएफ अकाउंटशी लिंक होईल.


रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांची कन्फर्म लोअर बर्थ कशी बुक कराल? रेल्वेने सांगितली पद्धत


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -