EPFO Facility : पीएफ खात्यातून भरा आता विमा पॉलिसीचा हप्ता; कसा ते वाचा

जेव्हा तुमच्या फॉर्म 14 पूर्ण भरून समबिट होईल आणि त्यावर अप्रूव्हल येईल त्यानंतरच LIC पॉलिसीचा प्रीमियम तुमच्या EPFO ​​खात्यातून प्रीमियमच्या देय तारखेला किंवा त्यापूर्वी कट होईल.

epfo facility employee provident fund organization update

EPFO Facility : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) संघटनेने आता EPFO सदस्यांची आर्थिक गरज लक्षात घेता त्यांनी PF खात्यातून विमा पॉलिसीचा हप्ता भरण्याची सुविधा दिली आहे. मात्र या सुविधेचा वापर अत्यंत काळजीपूर्वक झाला पाहिजे, कारण PF खात्यातील पैसा हा कष्टाने कमवलेलेा पैसा असतो.

LIC चा प्रीमियम भरण्याची सुविधा

EPFO ने खातेदराकांना ही सुविधा फक्त भारतीय जीवन विमा निगम (LIC) च्या पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी दिली आहे. त्यामुळे इतर कोणत्याही कंपनीच्या विमा पॉलिसीसाठी या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. मात्र प्रत्येक EPFO ​सदस्याला याचा फायदा घेता येणार नाही. यासाठी पीएफ खातेधारकांना EPFO ​कडे फॉर्म 14 सबमिट करणे गरजेचे आहे. हा फॉर्म खातेदारकांना ईपीएफओच्या वेबसाईटवर मिळेल.

फॉर्म 14 नेमका काय आहे?

पीएफ खातेदार EPFO वरून त्यांचा LIC पॉलिसीचा प्रीमियम भरण्यास परवानगी मागू शकतो.मात्र यासाठी आधी फॉर्म 14 भरावा भरून सबमिट करावा लागेल. यानंतर तुमचे LIC पॉलिसी आणि EPFO ​​खाते लिंक केले जाईल आणि नंतर तुमच्या PF खात्यातून LIC पॉलिसीचा प्रीमियम कट केला जाईल.

मात्र LIC पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी EPFO ​​कडून एक अट ठेवण्यात आली आहे. ती म्हणजे LIC च्या 2 वर्षांच्या प्रीमियम पेक्षा कमी रक्कम तुमच्या PF खात्यात असेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ मिळणार नाही.

जेव्हा तुमच्या फॉर्म 14 पूर्ण भरून समबिट होईल आणि त्यावर अप्रूव्हल येईल त्यानंतरच LIC पॉलिसीचा प्रीमियम तुमच्या EPFO ​​खात्यातून प्रीमियमच्या देय तारखेला किंवा त्यापूर्वी कट होईल.