घरदेश-विदेश22.55 कोटी EPFO खातेधारकांच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा; तुमच्या खात्यात जमा झाले...

22.55 कोटी EPFO खातेधारकांच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा; तुमच्या खात्यात जमा झाले का? असे तपासा

Subscribe

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पगारदार कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही टक्के रक्कम कट करते. जे पैसे निवृत्तीच्या वेळी किंवा गरजेच्या वेळी कामी येतात. EPFO संघटना कर्मचाऱ्यांना या रकमेवर व्याज देते.

नवीन वर्षात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (EPFO) कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात अद्याप व्याजाची रक्कम जमा झाली नाही अशी कर्मचाऱ्यांना व्याजाची रक्कम पाठवण्यात आली आहे. याचा फायदा सुमारे 6 कोटी कर्मचाऱ्यांना झाला आहे. 2021 – 2022 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 22.55 कोटी पीएफ खातेधारकांच्या खात्यात 8.50 टक्के दराने व्याज जारी केला आहे. तुमच्याही खात्यात हे पैसे जमा झाले की नाहीत ते तपासून घ्या.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पगारदार कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही टक्के रक्कम कट करते. जे पैसे निवृत्तीच्या वेळी किंवा गरजेच्या वेळी कामी येतात. EPFO संघटना कर्मचाऱ्यांना या रकमेवर व्याज देते. 2021- 22 या काळातील कर्मचाऱ्यांच्या खात्यात समान व्याजाचे पैसे जारी केले आहेत. तुमच्या खात्यात हे पैसे जमा झाले की नाही हे अशाप्रकारे तपासा.

- Advertisement -

मिस्ड कॉलवर तपासा शिल्लक रक्कम

पीएफ खात्याशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही UAN नंबरशिवाय देखील पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता. यासाठी EPFO खातेधारकांनी 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. परंतु जो नंबर पीएफ खात्याला लिंक आहे त्याच नंबरवरून मिस्ड कॉल देणे गरजेचे आहे. अशाप्रकारे मिस्ड कॉल दिल्यानंतर काही वेळातच तुमचा UAN नंबर आणि PF खात्यातील शिल्लक रकमेची माहिती मोबाईलवर येईल.

SMS वरही तपासू शकता रक्कम

पीएफ खातेधारक EPFO च्या SMS सुविधेद्वारे खात्यातील शिल्लक माहिती जाणून घेऊ शकतात. या सुविधेसाठी तुम्हाला 77382-99899 या क्रमांकावर EPFOHO UAN एसएमएस करावा लागेल. तुमचा UAN नंबर आणि PF खात्यातील शिल्लक माहिती एसएमएसद्वारे तुमच्या नंबरवर पाठवली जाईल.

- Advertisement -

ऑनलाईनही तपासू शकता माहिती

EPFO खातेधारक https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वेबसाइटला भेट देऊन त्यांची शिल्लक रक्कम तपासू शकतात . याठिकाणी तुम्हाला ई-पासबुक देखील मिळेल, जे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमच्या व्यवहारांचा संपूर्ण इतिहास सहज जाणून घेऊ शकता.


2022 मध्ये महागाई भत्त्यात वाढीची घोषणा होणार: 20 हजार बेसिकवर किती फायदा? जाणून घ्या


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -